गरमागरम लाल भोपळ्याचे सूप
Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi
तांबडा भोपळा हा आरोग्याच्या दृष्टीने हितावाह व पित्त शामक आहे. नाजुक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृती च्या लोकांसाठी लाभदायक आहे.
लाल भोपळ्याचे सूप छान टेस्टी लागते. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. त्याचा रंग सुद्धा अगदी मोहक येतो. तसेच आपण कमी कॅलरीयुक्त व पौस्टीक सूप बनवू शकतो. जर आपल्याला आपले वजन कमी करायचे असेल तर रेड पमकीन सूप मस्त आहे.
पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा थंडीमध्ये लाल भोपळ्याचे गरमागरम सूप मस्त लागते.
The Marathi language video of Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup can be seen on our YouTube Channel: Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup
बनवण्यासाठी वेल: 15 मिनिट
वाढणी: 2 जणासाठी
साहित्य:
1 कप लाल भोपळ्याचे तुकडे
1 छोटा कांदा (उभा चिरून)
1 टी स्पून बटर
1 छोटे तमाल पत्र
7-8 काळे मिरे
½ टी स्पून मिरे पावडर
1 टी स्पून लिंबूरस
2 टी स्पून फ्रेश क्रीम
मीठ चवीने
कृती: लाल भोपळा स्वच्छ धुवून, साल काढून, बिया काढून चिरून घ्या. कांदा उभा चिरून घ्या.
एका नॉनस्टिक पॅनमध्ये बटर गरम करून त्यामध्ये तमाल पत्र, मिरे घालून, चिरलेला कांदा घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये लाल भोपळ्याचे तुकडे घालून 2 कप पाणी घालून पॅनवर झाकण ठेवून 4-5 मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.
मग झाकण काढून भोपळा थंड करायला ठेवा. जास्तीचे पाणी एका बाउलमध्ये काढून बाकीचे मिक्सरमद्धे ब्लेड करून घ्या.
ब्लेड केलेले मिश्रण नॉन स्टिक पॅनमध्ये काढून बाजूला काढलेले पाणी, मीठ चवीने, लिंबूरस, मिरे पावडर घालून एक छान उकळी आणा. उकळी आलीकी सूप बाउलमध्ये काढून घ्या. वरतून मिरे पावडर व फ्रेश क्रीमने सजवून गरम गरम रेड पमकिन सूप सर्व्ह करा.