हेल्दी बीटरूट व गाजराचे कटलेट
Healthy Beetroot Carrot Tasty Breakfast Recipe In Marathi
बीटरूट व गाजर हे अगदी हेल्दी आहे तसेच टे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. लहान मुले व मोठे सुद्धा अगदी आवडीने खातील. आपण ब्रेकफास्टला किंवा जेवताना किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो. किंवा स्टार्टर डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.
बीटरूट व गाजर चा हा पदार्थ बनवताना बीटरूट गाजर, कोबी, शिमला मिरची, आले-लसूण-हिरवी मिरची वापरली आहे. हे डिश खूप टेस्टी लागते आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video Healthy Beetroot Carrot Tasty Breakfast can be seen on our YouTube Channel: Healthy Beetroot Carrot Tasty Breakfast
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहीत्य:
4 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
1 मध्यम आकाराचे बीटरूट (सोलून किसून)
1 मध्यम आकाराचे गाजर (सोलून, किसून)
¼ कप मटार
1 मध्यम आकाराची शिमला मिरची
1 कप कोबी (बारीक चिरून)
1” आले, 2-3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या
½ टी स्पून लाल मिरची पावडर
½ टी स्पून गरम मसाला
2 ब्रेड स्लाईस (क्रमब)
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
मीठ चवीने
तेल शालो फ्राय करण्यासाठी
2-3 टोस्ट (बारीक करून)
कृती:
प्रथम बटाटे उकडून सोलून किसून घ्या. गाजर धुवून सोलून किसून घ्या. शिमला मिरची बारीक चिरून घ्या. कोबी धुवून बारीक चिरून घ्या. बीटरूट धुवून सोलून किसून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या. ब्रेड क्रमब करून घ्या.
पॅन गरम करायला ठेवा त्यामध्ये कोबी, गाजर, शिमला मिरची घालून मिक्स करून 2-3 मिनिट झाकून ठेवा व मंद विस्तवावर वाफवून घ्या. मग झाकण काढून त्यामध्ये बीटरूट घालून परत झाकण ठेवून 2-3 मिनिट झाकून ठेवा व वाफवून घ्या. विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवा.
मग मिश्रणात उकडलेले बटाटे, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, कोथबिर, ब्रेड क्रमब, मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्याचे एक सारखे 8 बदमाच्या आकाराचे शेप बनवून घ्या. मग टोस्टच्या पावडर मध्ये घोळून घ्या.
नॉन स्टिक पॅन गरम करायला ठेवून त्यावर थोडे तेल घालून सर्व बदामच्या आकाराचे शेप ठेवा मग बाजूनी थोडे तेल सोडा व मध्यम विस्तवावर दोन्ही बाजूनी शालोफ्राय करून घ्या.
गरम गरम टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.