गाय व म्हशीच्या चिकापासून खरवस व त्याचे आश्चर्यकारक गुणधर्म
How To Make Kharvas With Cheek And Its Amazing Benefits In Marathi
आपणा सर्वाना खरवस हा परिचयाचा असेलच. गाय व म्हशीचा चिक हा अमृत समान असतो. आपल्याकडे अगदी पूर्वीच्या काळापासून असे म्हणतात की आईचे दूध हे जन्मलेल्या बाळाला अमृत समान असते कारण त्यामध्ये रोग प्रतिकार शक्ति खूप असते. ती बाळाला जन्मभर पुरते. त्याने बाळाला रोगांपासून वाचवते. म्हणून पहिले तीन दिवस बाळाला हे दूध खूप महत्वाचे असते.
गाय व म्हशीचा चिकामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते ते आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. तसेच त्यामध्ये कैल्सियम, मैग्नीशियम, फास्फोरस व क्लोराइउ असते. व विटामीन “ए” व “डी” सुद्धा असते. त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ति वाढते गाय व म्हैसीचा चिक पहिले तीन दिवस चांगला आरोग्यदाई असतो. Colostrum (कोलोस्ट्रम) हा घटक ह्या चिकामद्धे असतो.
The Marathi language video of How To Make Kharvas With Cheek And Its Amazing Benefits can be seen on our YouTube Channel: How To Make Kharvas With Cheek And Its Amazing Benefits
खरवस खाण्याचे गुणधर्म:
गाईचा किंवा म्हशीचा चिक आपल्याला बाजारात सहजपणे उपलब्ध होत नाही. काही वेळेस आपल्याला गाडीवर खरवस विकताना दिसतो पण बहुतेक तो खरवस चायना ग्रासने बनवतात त्यामध्ये कोणतेसुद्धा गुणधर्म नसतात. आपल्या माहितीच्या ठिकाणा वारूनच गाईचा किंवा म्हशीचा चिक आणून घरी त्याचा खरवस बनवावा.
•लहान मुलांना खरवस जरूर सेवन करायला द्यावा त्यामुळे त्यांची आतडी साफ होतात व रोग प्रतिकार शक्ति सुद्धा वाढते. (लहान मुलांना खरवस खायला दिल्यावर त्यांना थोडा आपचनाचा त्रास होतो पण त्यांची आतडी साफ होतात.)
* खरवस सेवन केल्याने पोटातील जे सूक्ष्म जीवाणु असतात ते नष्ट होण्यास मदत होते.
* खरवस मध्ये प्रोटिनचे प्रमाण अधिक असते त्यामुळे शारीरिक विकास चांगला होतो.
* खरवस मध्ये कैरोटिन हे आपल्या नेहमीच्या दुधापेक्षा जास्त प्रमाणात असते त्यामुळे आपल्याला विटामीन “ए” भरपूर प्रमाणात मिळते.
* खरवस हा उष्ण आहे त्यामुळे गरोदर महिलानी खाऊ नये.
गाईच्या किंवा म्हशीच्या चिकापासून आपण खरवस कसा बनवायचा ते पाहू या.
गाईच्या किंवा म्हशीच्या चिकापासून खरवस बनवताना पहिल्या दिवसाचा चिक घट्ट असतो. तेव्हा जेवढा चिक घेणार तेवहडेच दूध घ्यावे. दुसऱ्या दिवसाचा चिक थोडा कमी घट्ट असतो तर दुधाचे प्रमाण थोडे कमी करावे. व तिसऱ्या दिवसाचा चिक अजून थोडा पातळ असतो तर अजून थोडे कमी दूध घालावे.
चिकाच्या घट्ट पणावर दूध वापरावे नाहीतर दूध जास्त झाले तर वड्या विस्कळीत होतात किंवा कमी झालेतर रबरासारख्या चिवट होतात. चिकाच्या घट्ट पणावर दूध घालू शकता. तसेच आपण साखर किंवा गूळ सुद्धा घालू शकतो. वेलचीपावडर, जायफळ, केशर घालून अजून त्याची टेस्ट खूप छान येते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहित्य:
2 कप चिक
दूध आवश्यकते नुसार
½ कप साखर
1 टी स्पून वेलची पावडर
7-8 केसर काड्या
¼ टी स्पून जायफळ
कृती: एक स्टीलच्या भांड्यात गाईचा किंवा म्हशीचा चिक घेऊन त्यानुसार दूध घालावे. मग साखर, वेळीची पावडर, जायफळ पावडर व केसर घालून चांगले मिक्स करावे.
एक मोठ्या आकाराचे स्टीलचे भांडे घेऊन त्यामध्ये 2-3 ग्लास पाणी घालावे. पाणी गरम झालेकी भांड्याच्या आकाराची खोलगट स्टीलची प्लेट ठेवून त्या प्लेट मध्ये बनवलेला चिक घालून त्यावर झाकण ठेवावे. मध्यम विस्तवावर 12-15 मिनिट वाफेवर चिक शिजवून घ्या.
मग स्टीलची प्लेट काढून खरवस थंड करायला ठेवा. मग त्याच्या चौकोनी वड्या कापून फ्रीजमद्धे 2-3 तास थंड करायला ठेवाव्या. थंड झाल्यावर सर्व्ह कराव्या.
टीप: चिक कोणत्या दिवसांचा आहे त्याप्रमाणे दूध वापरावे. वरती सविस्तरपणे दिले आहे. खरवसाच्या वड्या फ्रीजमध्ये 7-8 दिवस छान राहतात.