कपड्यांचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला तर 4 सोपे सटीक
Kapdyancha color Dusrya Kapdyala Lagla 4 Sope Satik Upay In Marathi
The Marathi language video of this Kapdyancha color Dusrya Kapdyala Lagla 4 Sope Satik Upay can be seen on our YouTube Channel: Kapdyancha color Dusrya Kapdyala Lagla 4 Sope Satik Upay
आपण बरेच वेळ कपडे धुताना सर्व प्रकारचे कपडे एकदम भिजवतो मग ज्या कपड्याचा रंग जात असेल तो रंग दुसऱ्या कपड्याला लागतो.
कॉटनच्या रंगीत कपड्याचा रंग बऱ्याच वेळा जातो. म्हणून नवीन कॉटनचे कपडे धुताना प्रथम मिठाच्या पाण्यात 2-3 मिनिट भिजवावे मग धुवावे. म्हणजे त्याचा रंग पक्का होतो व कपडेपण चमकदार राहतात.
कॉटनचे कपडे धुतल्यावर वाळत घालताना एकदम उन्हात वाळत न घालतात ते उलटे करून सावलीत वाळवावे म्हणजे त्याचा रंग जात नाही व बरेच दिवस कपडे नव्या सारखे दिसतात. तसेच कॉटनच्या कपड्याना इस्त्री करताना कपडा उलट करून मग इस्त्री करावी त्यामुळे सुद्धा कपडे बरेच दिवस नव्या सारखे दिसतात.
आता आपण पाहूया एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला तर काय करावे. हा प्रश्न बरेच जणांना आहे.
प्रथम उपाय:
एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला असेल तर एका वाटीत कच्चे दूध घ्या व एक टुथ ब्रश घ्या. आपण नेहमी वापरलेले टुथ ब्रश टाकून न देता ते ठेवावे. त्याचा उपयोग खूप होतो ते आपण नंतरच्या विडियो मध्ये बघणार आहोत. तर मग आपण कच्चे दूध व ब्रश घेऊन ब्रश दुधात बुडवून जेथे जेथे रंग लागला आहे तेथे दूध लावावे मग ब्रशने थोडे घसावे. असे 2-3 वेळा करावे. मग एका बादलीमद्धे पाणी घेऊन त्यामध्ये सर्फ घालून कपडा 5-10 मिनिट सर्फच्या पाण्यात भिजत ठेवावा. मग थोडा हातानी चोळून धुवावा. मग उलटा करून बाहेर वाळत घालावा.
दूसरा उपाय:
एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागला असेल तर एका वाटीत दूध घेऊन एक अर्धे लिंबू चिरून घ्या. मग लिंबू दुधामद्धे बुडवून जेथे डाग लागला आहे तेथे लावून लिंबानीच डागावर रगडावे. असे 2 वेळा करावे. मग कपडा सर्फच्या पाण्यात 5-10 मिनिट भिजत ठेवून मग स्वच्छ पाण्यानी धुवावा. मग उलटा करून बाहेर वाळत घालावा सुकल्यावर त्याला इस्त्री करावी.
तिसरा उपाय:
होळीच्या वेळी आपल्या कपड्याना रंग लागतो व त्या रंगांमध्ये केमिकल्स असतात त्यामुळे आपल्याला चिंता वाटते की हे रंग कसे काढायचे तेव्हा रंग लागलेले कपडे एक बादलीत पाणी घेऊन त्यामध्ये एक लिंबू पीळ व कपडा अर्धा तास तसाच भिजत ठेवा. मग स्वच्छ पाण्यानी धुवा.
चौथा उपाय:
जर कपड्याला खूपच दूसरा रंग लागला आहेतर ½ वाटी लिंबूरस घेऊन कपड्यावर लावून चांगला ब्रश मारा मग स्वच्छ पाण्यानी कपडा धुवावा.