शास्त्रानुसार आपली नख व केस कोणत्या दिवशी कापावे
In Auspicious Days For Cutting Hair And Nails In Marathi
The Marathi language video of In Auspicious Days For Cutting Hair And Nails can be seen on our YouTube Channel: In Auspicious Days For Cutting Hair And Nails
ब्रह्मांडचा एक भाग म्हणजे पृथ्वी आहे. पृथ्वीवर माणसाचा जन्म झाला आहे. ब्रह्मांडच्या उर्जेचा प्रभाव हा मानवी जीवनावर होतो. तसे पाहिलेतर शरीरावरील प्रतेक भागावर त्या उर्जेचा परिणाम होतो पण त्यातील महत्वाचे म्हणजे आपल्या डोक्याचा वरचा भाग व बोटाची नखे हे खूप संवेदनशील असतात त्यावर जास्त प्रभाव पडतो.
ह्या दोन्ही भागांना सुरक्षा मिळावी म्हणून काही उपाय अगदी काटेकोरपणे पाळावे.
आठोडयातील काही दिवस असे आहेत की त्याचा दिवशी नखे किंवा केस कापलेतर तर त्यातून आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा मिळते व आपल्या शरीराला काही ना काही इजा होते व ते अगदी नकळत होते.
आता आपण पाहूया नख कधी कापायची किंवा कधी कापायची नाही व त्याचे परिणाम काय आहेत.
शनिवार, मंगळवार व गुरुवार ह्या दिवशी नख कापू नयेत. कारण पुढे दिले आहे.
शनिवार ह्या दिवशी नख कापलीतर आपले आयुष्य कमी होते व घरात दारिद्र येते असे म्हणतात.
मंगळवार ह्या दिवशी नख कापलीतर बहीण भवांमद्धे मतभेद होतात. आपल्या शरीरातील साहस व पराक्रम ह्याचा अभाव होतो तसेच रक्ता संबंधी रोज होतात.
गुरुवार ह्या दिवशी नख कापलीतर विद्या प्राप्ती नीट होत नाही. आपल्या गुरु बरोबर कुरबुर होते व पोटाचे विकार होण्याची शक्यता असते. तसेच ह्या दिवशी ग्रहांच्या शक्तीचा परिणाम आपल्या शरीरावर होतो.
नख कधी कापावीत.
सोमवार, रविवार, बुधवार, व शुक्रवार ह्या दिवशी नख कापणे शुभ मानले जाते.
केस कधी कापावे
रविवार, बुधवार, व शुक्रवार ह्या दिवशी केस कापणे शुभ मानले जाते.
केस कधी कापू नयेत.
सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार ह्या दिवशी केस कापणे अशुभ मानले जाते त्यामुळे नुकसान होऊ शकते.
सोमवार ह्या दिवशी केस कापले तर आपल्या मुलांच्या शीकक्षणात अडथळे येतात. व मुलांना इजा होऊ शकते. कारण त्या दिवशी केस कंपणाऱ्याचे मन प्रसन्न नसते.
मंगळवार ह्या दिवशी केस कापले तर धना संबंधी नुकसान होते. जर तुमच्या राशीमधील मंगळ ग्रह कमजोर असेल तर केस कापल्याने मंगळ ग्रह अशुभ फळ देतो.
गुरुवार ह्या दिवशी केस कापलेतर गुरु ह्या ग्रहाची शुभ फळ मिळत नाहीत. तसेच वारिष्ट व्यक्तिशी कुरबुर होऊन वैवाहिक जीवनात मतभेद होतात.
शनिवार ह्या दिवशी केस कापलेतर शनिह्या ग्रहाची शक्ति कमी होते. नाहीतर घरातील नोकर काम सोडून जाऊ शकतो व मनामध्ये चुकीचे काम करायचे विचार येतात. ज्याना कंबरेचे दुखणे आहे किंवा सांधेदुखीचे दुखणे आहे त्यानी शनिवार ह्या दिवशी केस कापणे, किंवा दाढी करणे टाळावे.
तसेच सोमवार , मंगळवार, गुरुवार व शनिवार ह्या दिवशी दाढी सुद्धा करू नये. बुधवार, शुक्रवार, व रविवार ह्या दिवशी दाढी केली तर सुख व समृद्धी मिळते.