झटपट चटपटा हेल्दी नाश्ता मुलांसाठी रेसीपी
Jhatpat Chatpata Healthy Nasta For Kids Recipe in Marathi
मुले भाजी खायचा कंटाळा करतात. पण आपण अश्या प्रकारे नाश्ता मुलांना बनवून दिला तर एका मिनिटांत ते फस्त करतील. आपण अश्या प्रकारचा नाश्ता सकाळी किंवा दुपारी सुद्धा बनवू शकतो. मुले अगदी आवडीने खातील.
नाश्ता बनवताना तांदूळ व भाज्या वापरल्या आहेत. तसेच आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of Zatpat Chatpata Healthy Nashta For Kids can be seen on our YouTube Channel: Zatpat Chatpata Healthy Nashta For Kids
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
2 वाटी तांदूळ (4 तास भिजवून)
1 छोटा बटाटा
3 हिरव्या मिरच्या
2 टे गाजर (बारीक चिरून)
2 टे स्पून शिमला मिरची (बारीक चिरून)
2 टे टोमॅटो (बारीक चिरून)
2 टे स्पून कोथबिर (बारीक चिरून)
1 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
1 टी स्पून जिरे
½ टी स्पून बेकिंग पावडर
तेल फ्राय करण्यासाठी
कृती: प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून 4 तास पाण्यात भिजत घाला. मग पाणी काढून मिक्सर मध्ये तांदूळ घेऊन थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्या. गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कोथबिर बारीक चिरून चिरून घ्या.
मग वाटलेले तांदळाचे मिश्रण बाउलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये चिरलेलले गाजर, शिमला मिरची, टोमॅटो, कोथबिर, लाल मिरची पावडर, मीठ, जिरे घालून मिक्स करा मग त्यामध्ये बेकिंग पावडर घालून हळुवार पणे मिक्स करा.
नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा. त्याला थोडेसे तेल लावून त्यावर छोटे छोटे पॅनकेक घाला. म्हणजेच धिरडी घाला मग बाजूनी थोडेसे तेल सोडा व पॅनवर 3-4 मिनिट झाकण ठेवून मंद विस्तवावर बेक करून घ्या. 3-4 मिनिट झाल्यावर झाकण काढून घ्या व पॅनकेक उलट करून घ्या. बाजूनी परत थोडेसे तेल सोडा. 2-3 मिनिट तसेच मंद विस्तवावर ठेवा.
मग प्लेटमध्ये काढून टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.