महाराष्ट्रीयन लोकप्रिय डिश बनवून बघा सगळे बोटे चाटत राहतील
Maharashtrian Authentic Dish You Must Try Recipe In Marathi
महाराष्ट्रीयन लोकप्रिय डिश बनवून बघा सगळे बोटे चाटत राहतील ही डिश बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. आपण चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकतो. अश्या प्रकारची ग्रेव्ही आपण जेवणात किंवा ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language video of Maharashtrian Authentic Dish You Must Try can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Authentic Dish You Must Try
ह्या महाराष्ट्रियन डिशचे नाव आहे कट वडा. आता तोंडाला पाणी सुटलेना. अशी चमचमीत डिश सर्वाना आवडते.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
मसाला ग्रेव्ही करिता:
2 ½ टे स्पून तेल
2 मोठे कांदे (चिरून)
8 लसूण पाकळ्या व ½” आले तुकडा
1 मध्यम आकाराचा टोमॅटो
¼ कप सुके खोबरे (किसून)
(कच्चा मसाला: 2 लवंग, 1” दालचीनी तुकडा, 1/4 टी स्पून प्रतेकी जिरे, शहा जिरे, धने, छोटी मसाला वेलची, 2 हिरवे वेलदोडे, ½ तमालपत्र)
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून लाल मिरची पावडर
कट वडा साठी:
1 टे स्पून तेल
¼ टी स्पून हळद
¼ टी स्पून हिंग
7-8 कडीपत्ता पाने
4 मध्यम आकाराचे बटाटे (उकडून, सोलून, कुस्करून)
2-3 हिरव्या मिरच्या व 5 लसूण पाकळ्या
1 छोटे लिंबू (रस काढून)
2 टे स्पून कोथबिर (धुवून, चिरून)
मीठ चवीने
आवरणांसाठी:
1 कप बेसन
1 टे स्पून तांदळाचे पीठ
1 टी स्पून लाल मिरची पावडर
½ टी स्पून हळद
मीठ चवीने
एक चिमूट बेकिंग सोडा
तेल तळण्यासाठी
सजावटीकरिता:
कोथबिर, कांदा व शेव
कृती:
मसाला ग्रेव्ही करिता: पॅनमध्ये एक टे तेल गरम करून त्यामध्ये कच्चा मसाला घालून त्यामध्ये कांदा घालून 3-4 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये आले-लसूण घालून मिक्स करून किसलेले सुके खोबरे घालून 2 मिनिट परतून चिरलेला टोमॅटो घालून एक मिनिट परतून घ्या. विस्तव बंद करून मसाला थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर थोडे पाणी वापरुन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून 1 ½ टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला घालून तेल सुटे पर्यन्त परतून घ्या. मसाला परतून झालकी त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर व मीठ घालून मिक्स करून 2 कप पाणी घालून चांगली 10 मिनिट ग्रेव्ही चांगली शिजू द्या. मग त्यामध्ये कोथबिर घालून 2 मिनिट मसाला परत शिजू द्या. विस्तव बंद करून झाकून बाजूला ठेवा.
कट वडा: बटाटे उकडून, सोलून, कुस्करून घेऊन त्याला लिंबूरस, कोथबिर व मीठ लावून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून हळद, हिंग, कडीपत्ता पाने, हिरवी मिरची व आले कुटून घालून मिक्स करा. थोडेसे परतून त्यामध्ये उकडलेले बटाटे घालून मिक्स करा व एक चांगली वाफ येवू द्या. थंड झाल्यावर त्याचे छोटे छोटे गोळे बनवा.
आवरणासाठी: एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद व मीठ घालून पाणी घालून मिश्रण भजाच्या पिठासारखे भिजवून घ्या. मग त्यामध्ये खायचा सोडा एक चिमूट घालून हळुवार पणे मिक्स करून घ्या.
कढईमद्धे तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झालेकी एक गोळा घेऊन बेसनच्या मिश्रणात घोळून गरम तेलात सोडा असे 2-3 गोळे सोडून मध्यम विस्तवावर गोल्डन रंगावर तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे तळून घ्या.
एक प्लेटमध्ये तळलेले वडे ठेवून त्यावर गरम गरम ग्रेव्ही घालून वाड्याच्या वरती चिरलेला कांदा, कोथबिर व बारीक शेव घालून सजवून सर्व्ह कर.