Navratri 2020 Ghatasthapana (Kalash Sthapana) Muhurat Puja Vidhi In Marathi

Navratri 2020 Ghatasthapana (Kalash Sthapana) Muhurat Puja Vidhi
Navratri 2020 Ghatasthapana (Kalash Sthapana) Muhurat Puja Vidhi

नवरात्र 2020 घटस्थापना (कलश स्थापना) कशी करावी, मुहूर्त व पूजाविधी 

Navratri 2020 Ghatasthapana (Kalash Sthapana) Muhurat Puja Vidhi In Marathi

साक्षात परमात्म्याने मातृरूपात स्वतःचा केलेला आविष्कार म्हणजे देवी! ती आद्य शक्ति, देवमाता, विश्वजननी आहे. सत्ययुगात “परविद्या” , त्रेतायुगात “श्रीविद्या” , द्वापारयुगात ती ब्रह्मविद्या, तर कलीयुगात ती शक्तिविद्या आहे.

The Marathi language video Navratri 2020 Ghatasthapana (Kalash Sthapana) Muhurat Puja Vidhi can be seen on our YouTube Channel: Navratri 2020 Ghatasthapana (Kalash Sthapana) Muhurat Puja Vidhi

2020 ह्या वर्षी नवरात्री एक महिना लांबली आहे कारण की ह्या वर्षी अधिक महिना आला आहे. ह्या वर्षी नवरात्र 17 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहे. दरवर्षी पितृ पक्ष संपला की नवरात्र सुरू होते. ह्या वर्षी नवरात्रमध्ये काही चांगले संयोग होत आहेत.

2020 ह्या वर्षी नवरात्र 10 दिवस आहे. ह्या दिवसांत देवी माताची नऊ रूप असतात व त्या रूपांची पूजा करतात. ह्या वर्षी नवरात्रि मध्ये राजयोग, द्विपुष्कर योग, सिद्धियोग, सर्वार्थसिद्धि योग, सिद्धियोग व अमृत योग असे संयोग येत आहेत.

नवरात्री 17 ऑक्टोबर 2020 शनिवार पासून आरंभ होत आहे. हा संयोग 165 वर्षा नंतर येत आहे. असे म्हणतात की नवरात्री मध्ये माता दुर्गाचे मंत्रपठन करणे फार उत्तम असते. तसेच 25 ऑक्टोबर 2020 ह्या दिवशी दसरा असून रविवार हा दिवस आहे.

2020 वर्षी माता दुर्गा घोड्यावर बसून येत आहे. असे म्हणतात की माता ज्या वाहनावर बसून येते ते आपल्याला भविष्याचे संकेत मिळतात. ह्या वर्षी माता घोड्यावर बसून शनिवार ह्या दिवशी येणार आहे तर त्याचे चांगले संकेत नाही असे म्हणतात. त्यामुळे शेजारील देशात युद्ध, राजकारणात उलटसुलट, व साथीचे रोग व शोकाकूल वातावरण होते. तसेच देवी माता म्हशीवर बसून विदा होणार आहे ते सुद्धा शुभ संकेत नाहीत. म्हणून ह्या वर्षी देवी माताची अगदी मनापासून आराधना केली पाहिजे.

Navratri 2020 Ghatasthapana (Kalash Sthapana) Muhurat Puja Vidhi
Navratri 2020 Ghatasthapana (Kalash Sthapana) Muhurat Puja Vidhi

घटस्थापना किंवा कलश स्थापना मुहूर्त:
शारदीय नवरात्र आरंभ : 17 ऑक्टोबर 2020 शनिवार सकाळी 6:27 मिनिट ते सकाळी 10:13 मिनिट पर्यन्त
घटस्थापना अभिजीत मुहूर्त सकाळी 11: 44 मिनिट ते 12: 29 मिनिट पर्यन्त
नवरात्र समाप्ती: 25 ऑक्टोबर 2020 रविवार दसरा : दुपारी 1:57 मिनिट ते 2: 42 मिनिट पर्यन्त

नवरात्र घटस्थापन पूजा साहित्य:
एक चौरंग, त्यावर आसन घालावे, तांब्याचा कलश पाणी भरून किंवा चांदीचा किंवा मातीचा कलश, परात मातीची किंवा बांबूची टोपली,(नसेल तर केळीच्या पानावर मातीचा 2” थर मातीचा करावा) नारळ, हळद-कुंकू, आंब्याची किंवा विडयाची 5 पाने, लाल रंगाचे कापड, लाल दोरा (शुभ कार्यसाठी मनगटावर बांधतात तो) 2 सुपारी (एक सुपारी गणपती म्हणून ठेवण्यासाठी व दुसरी कलशात ठेवण्यासाठी), तांदूळ (अक्षता), अत्तर, नाणी, दूर्वा, हार, फुले, माती (चंगल्या प्रतीची माती), सात धान्य (सातू, तीळ, तांदूळ, मूग, ज्वारी, हरभरा, व गहू ), रांगोळी व रंग, समई व वात, तेल, घंटा देवीसाठी नेवेद्य (जर तुम्हाला सजवायचे असेल तर थाळी भोवती फुलाची आरास करावी

घटस्थापना किंवा कलश स्थापना कशी करायची:
• पूजा मांडायची जागा स्वच्छ करून घ्या. एक चौरंग ठेवावा त्यावर स्वच्छ लाल रंगाचे कापड घालावे व बाजूनी छान रांगोळी काढून रंग भरावे.
• प्रथम आपण अगदी चांगल्या प्रतीची माती घेऊन चाळून घ्या.मातीचे दोन भाग करून घ्या. एक भाग तसाच ठेवा दुसऱ्या भागात बिया घालून मिक्स करा.
• एक स्टीलची थाळी किंवा परात चौरंगावर ठेवावी त्यामध्ये मातीची थाळी किंवा परडी ठेवावी. मग त्यामध्ये पहिल्या भागाची माती पसरवून त्यावर दुसऱ्या भागाची बिया मिक्स केलेली माती हलक्या हातांनी पसरून घ्या (आजिबात दाबायची नाही). मग थोडेसे पाणी शिंपडायचे.
• आता आपण कलश तयार करायचा आहे. कलश घेऊन वरच्या बाजूला लाल धागा बांधून हळद-कुकु चारही बाजूला लावा. मग त्यामध्ये गंगाजल भरून घ्या. जर गंगाजल नसेल तर स्वच्छ पिण्याचे पाणी भरा. त्यामध्ये सुपारी, अत्तर, दूर्वा, अक्षता, फूल व नाण घाला.
• कलश वरती पाच आंब्याची किंवा विडयाची पाने ठेवा. एक नारळ घेऊन त्याला हळद-कुकु लावावे. मग नारळ कलशावर ठेवावा. कलशावर हळद-कुकु-अक्षता व फूल वाहावे.
• बाजूला समईमध्ये वात लावून तेल घालून बारीक वात लावावी म्हणजे ती जास्त वेळ टिकते ही समई अखंड तेवत ठेवावी.
• रोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा, आरती, आराधना करावी व देवीचा मंत्र म्हणावा. रोज कलशाच्या बाजूनी मातीवर पाणी शिंपडावे. रोज सकाळ संध्याकाळ देवी मातेला नेवेद्य दाखवावा. रोज वेगवेगळ्या रंगाच्या फुलांची माळ घालावी.

The Marathi language video of Navratri 2020 list of 9 colours And their Significance can be seen on our YouTube Channel of :  Navratri 2020 list of 9 colours And their Significance

The Marathi language video Navratri 2020 Durga Mata 9 Forms (Roop) Name And Importance can be seen on our YouTube Channel: Navratri 2020 Durga Mata 9 Forms (Roop) Name And Importance

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.