हेल्दी गाजर-मुळा बटाटा पराठा रेसीपी इन मराठी
Nutritious Gajar-Mula Batata Paratha In Marathi
गाजर, मुळा व बटाटा हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. त्याचा पराठा आपण नाश्तासाठी किंवा जेवणात किंवा मुलानसाठी शाळेत जाताना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे.
गाजरामद्धे व मुळयामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस आहे. जीवनसत्व ए भरपूर प्रमाणात आहे ते आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी हितावह आहे. बटाटा सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे.
हेल्दी गाजर-मुळा बटाटा पराठा आपण टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of Nutritious Gajar-Mula Batata Paratha can be seen on our YouTube Channel: Nutritious Gajar-Mula Batata Paratha
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 4 पराठे बनतात
सारणा करीता साहीत्य:
2 छोटे मुळे (धुवून किसून)
2 मोठे बटाटे (उकडून, सोलून किसून)
1 मोठे गाजर (सोलून किसून)
1 टे स्पून तेल
½ टी स्पून जिरे
2 हिरव्या मिरच्या 1/2 “ आले (कुटून)
¼ टी स्पून हळद
मीठ चवीने
2 टे स्पून कोथबिर
तेल हेल्दी गाजर-मुळा बटाटा पराठा भाजण्यासाठी
तूप वरतून लावण्यासाठी
आवरणासाठी साहित्य:
2 कप गव्हाचे पीठ
मीठ चवीने
1 चमचा तेल
कृती: प्रथम मुळा धुवून, सोलून व किसून घ्या. गाजर धुवून, सोलून व किसून घ्या. बटाटे उकडून, सोलून किसून घ्या. हिरवी मिरची व आले कुटून घ्या. कोथबिर धुवून चिरून घ्या.
आवरणासाठी: गव्हाचे पीठ, मीठ घालून मळून घेऊन तेल लावून मळून घ्या.
सारणासाठी: एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, व हिरवी मिरची व आले घालून थोडेसे परतून घ्या. मग त्यामध्ये किसलेला मुळा व गाजर घालून मिक्स करून 2 मिनिट झाकून वाफेवर शिजवून घ्या. मग झाकण काढून त्यामध्ये मीठ चवीने , हळद घालून कीसलेला बटाटा घालून मिक्स करून कोथबिर घाला व झाकण ठेवून एक मिनिट वाफ येवू द्या.
पराठा करिता: मळलेल्या पिठाचे एक सारखे 8 गोळे बनवा. दोन गोळे घेऊन पुरी सारखे लाटा. एक पुरीवर एक मोठा चमचा सारण ठेवून पसरवून त्यावर दुसरी पुरी ठेवा. पुरीच्या कडा दाबून मग लाटून घ्या.
तवा किंवा पॅन गरम करून त्यावर लाटलेला पराठा घालून थोडे तेल घालून दोन्ही बाजूनी छान खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून घ्या.
गरम गरम मुळा, गाजर, बटाटा पराठा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.