पारिजात प्राजक्ता फुलाचे रहस्य व औषधी गुणधर्म
Parijat Flower (Night Jasmine) Importance And Medicinal Benefits In Marathi
पारिजातकाची फुले ही सुंदर व आकर्षक दिसतात. हिंदू धर्मामध्ये त्याचे खूप महत्व आहे. पारिजातकाचे आकर्षक रूप आपल्याला अगदी मोहून टाकतो. आपल्या शास्त्रामध्ये त्याचे खूप महत्व पूर्ण स्थान आहे आणि त्याचे वृक्ष शुभ व पवित्र मानले जाते.
The Marathi language video of Parijat Flower (Night Jasmine) Importance And Medicinal Benefits can be seen on our YouTube Channel: Parijat Flower (Night Jasmine) Importance And Medicinal Benefits
आयोध्यामध्ये राम मंदिरचे भूमीपूजनसाठी जेव्हा श्री मोदीजीचे आगमन झाले होते तेव्हा श्री मोदीजीनी पारिजातच्या फुलांचे वृक्ष तेथे लावले कारण त्यामागे एक कारण आहे. जेव्हा राम, लक्ष्मण व सीतामाता 14 वर्ष वनवासासाठी गेले होते तेव्हा सीतामाता प्राजक्ता पारिजातच्या फुलानी शृंगार करत असे. म्हणून ह्या फुलांना हरशृंगारची फुले असे सुद्धा म्हणतात.
प्रथम आपण पारिजात फुलाची एक सुंदर कथा आहे ती पाहूया मग त्याचे महत्व व गुणधर्म पाहू या.
देवाची पूजा करताना देवाला पारिजातकाची फुले अर्पण करतात. कारणकी ही फुले पवित्र मनाली जातात व देवांना खूप आवडतात. पारिजात फुलांचा एक गुणधर्म आहेकी जर आपल्याला खूप थकल्या सारखे वाटत असेल तर हातात आपण पारिजातकाची फूल घेतली तर आपली थकान निघून जाते व खूप ताजेतवाने वाटते. असे म्हणतात की स्वर्गा मधील अप्सरा पारिजातकाच्या वृक्षाला हात लावून त्यांची थकान दूर करत होत्या.
पारिजातच्या वृक्षाला दैवीय वृक्ष म्हणतात. ह्या वृक्षाला वर्षातून फक्त एक महिना म्हणजे सप्टेंबर व ऑक्टोबर च्या आसपास फूल येतात. त्याची फुले जेव्हा पडतात तेव्हा ती वृक्षाच्या जवळ पडत नाही जरा दूरवर त्याचा सडा पडतो.
पारिजातकाच्या फुलाची कथा की कृष्ण व रुक्मिणीच्या प्रेमावर सत्यभामाच्या द्वेषावर आधारित आहे.असे म्हणतात की कृष्ण व रुक्मिणी वटिकामध्ये बसले असताना नारद ऋषि इन्द्रलोक मधील पारिजातची फूल घेऊन श्री कृष्ण ह्याच्या जवळ गेले व ती फूल त्यानी श्री कृष्ण ह्यांना दिली तेव्हा शेजारीच पत्नी रुक्मिणी बसली होती त्यानी ती तिला दिली हे नारद ऋषि हयानी पहिलं लगेच नारद ऋषि श्री कृष्णाच्या दुसऱ्या पत्नी सत्यभामा ह्याच्या जवळ जाऊन म्हणाले श्री कृष्ण हयानी पारिजातची फूल रुक्मिणी ह्याना दिली तुमच्या साठी एक फूल सुद्धा नाही ठेवले. हे आईकुन सत्यभामाला खूप राग आला. मग सत्यभामा श्री कृष्ण ह्याच्या जवळ जावून हट्ट करायला लागली की मला पारिजातचा दिव्य वृक्ष पाहिजे.पारिजातकाचा वृक्ष देवलोकामध्ये म्हणजे स्वर्गात होता. तेव्हा श्री कृष्ण हयानी सत्यभामा ह्याना सांगितले की ते इन्द्र ह्याना आग्रह करून ते वृक्ष आणून देतील.
नारद ऋषि पती पत्नी मध्ये भांडण लावून इन्द्र भगवान ह्याच्याकडे गेले व त्यांना म्हणले की मृतयु लोकात भांडण चालू आहे पण स्वर्गातील पारिजातचे वृक्ष हे स्वर्गातच राहिले पाहिजे.
तेव्हडयात श्री कृष्ण व त्याची पत्नी सत्यभामा इंद्राच्या जवळ आले. तेव्हा प्रथम इन्द्र हयानी पारिजात चा वृक्ष त्यांना द्यायला नकार दिला. पण शेवटी त्यांना तो वृक्ष द्यायला लागला मग श्री कृष्ण जेव्हा तो वृक्ष घेऊन जात होते तेव्हा इन्द्र भगवान हयानी त्या वृक्षाला शाप दिला की ह्या वृक्षाची फूल दिवसा उमलणार नाहीत. पण श्री कृष्ण अगदी हुशार त्यानी तो वृक्ष मृतयू लोकात आणला व सत्यभामाच्या बागेत लावला. पण त्यानी काय केले की पारिजातकाचा सडा जेव्हा पडेल तेव्हा तो रुक्मिणीच्या बागेत पडेल. असे केले. अशीनी सत्यभामाला वृक्ष तर मिळाला पण त्याची फूल रुक्मिणीला मिळत होती.
अजून एक कथा आहे की पारिजात नावाची एक राजकन्या होती तेची प्रेम सूर्य भगवान ह्याच्यावर होते पण सूर्य भगवान हयानी तिच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही म्हणून ती नाराज होऊन तिने आत्महया केली. मग ज्या जागेवर पारिजात ची समाधी बनवली गेली तिथे पारिजातकाचे वृक्ष लावले गेले व त्याचा सडा समाधी वर पडत होता म्हणून असे म्हणतात की रात्रीच्या वेळी पारिजातकाची फूल रडत आहेत व सकाळी सूर्योदयच्या वेळी फुले हसत आहेत.
म्हणून त्याचे नाव पारिजात ठेवले गेले.
लक्ष्मी देवीला पारिजात काची फूल खूप प्रिय आहेत.
पारिजातच्या फुलांना प्रजक्ताची फुले असे म्हणतात. त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते पाहूया.
• पारिजात च्या फुलांचा रस काढून सेवन केल्यास हृदयरोग दूर होतो
• पारिजातच्या पानाचा रस काढून सेवन केल्यास ताप आलेला लवकर निघून जातो.
• पारिजातच्या वृक्षाची साल 2 ग्राम, पाने 2 ग्राम व तुळशीची पाने 2-3 घेऊन एक ग्लास पाण्यात उकळून टे पाणी सकाळ संध्याकाळ घेतल्यास शरीरातील कमजोरी व दुखण कमी होते.
• पारिजातकाच्या वृक्षाचा लेप बनवून जर हाड दुभंगले गेले असेल तेथे लावून त्यावर घट्ट कापड बांधल्यास लवकर आराम मिळतो पण हा प्रयोग आपल्या डॉक्टरी इलाज व औषधान बरोबर करावा.
• पारिजात च्या पानाचा रस सेवन केल्यास रक्त साफ होते.
• पारिजातच्या पानाचा लेप जखमेवर लावल्यास लवकर जखम भरून येते.
• पारिजात च्या फुलांचा रस काढून पाण्यामध्ये मिक्स करून सेवन केल्यास केसान संबंधी तक्रारी दूर होऊन केस लांब, चमकदार, व दाट होतात तसेच केसांतील उवा, कोंडा निघून जातो.
• पारिजातकाची फूलांचा सुवास घेतल्यास मन प्रफुलीत होते व मानसिक टेंशन दूर होते. नकारात्मक विचार निघून जातात.
टीप: पारिजातकाची ही माहिती दिली आहे पण त्याचा उपयोग डॉक्टरी इलाज बरोबर आपल्याला योग्य वाटल्यास करावा.