सर्वपित्री दर्श अमावस्या महत्व व मंत्र
Sarvapitri Darsha Amavasya Importance And Mantra In Marathi
आता सध्या दिनांक 1 सप्टेंबर 2020 मंगळवार ह्या दिवसापासून ते 17 सप्टेंबर 2020 गुरुवार ह्या काळात पितृ पंढरवडा चालू आहे. ह्या काळात आपल्या घरातील पितरांना शांत करण्यासाठी श्राद्ध केले जाते. ह्या काळात काय करायला पाहिजे त्याचा विडियो ह्या अगोदर प्रकाशित केला आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
The Marathi language video of Don Sarvapitri Darsha Amavasya Importance And Mantra can be seen on our YouTube Channel: Sarvapitri Darsha Amavasya Importance And Mantra
17 सप्टेंबर 2020 गुरुवार ह्या दिवशी सर्वपित्री अमावास्या आहे. त्यालाच दर्श अमावास्या किंवा आश्विन अमावास्या असे सुद्धा म्हणतात. हा दिवस श्राद्ध करण्याचा शेवटचा दिवस मानला जातो.
अमावास्या आरंभ: 16 सप्टेंबर 2020 बुधवार रात्री: 7:57
अमावास्या समाप्ती: 17 सप्टेंबर 2020 गुरुवार सायंकाळी: 4:30
शास्त्रा नुसार ज्याना आपल्या पितरांची तिथी माहीत नाही त्यानी सर्वपित्री अमावास्या ह्या दिवशी श्राद्ध करावे. ह्या दिवशी श्राद्ध केल्याने आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळतो.
सर्वपित्री अमावास्या च्या दिवशी सकाळी लवकर उठून, स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. घरातील जेष्ठ व्यक्तीने पिंड दान करावे त्यासाठी आटा, तीळ व भात ह्याने पिंड दान करावे.
सर्वपित्री अमावास्या च्या दिवशी बनवलेले जेवण सर्व प्रथम कावळ्याला, मग गाईला मग कुत्र्याला जेवण द्यावे. असे म्हणतात की आपले पितर ह्याच्या रूपात येवून जेवण करतात.
ज्याच्या घरात श्राद्ध करण्यासाठी पुत्र नसेल त्याच्या घरातील महिलानी केले तरी चालते.
श्राद्ध करताना बरेच लोकाना आपले गोत्र माहीत नसते किंवा कुलदेवत माहीत नसते, आपले पूर्वजनान बद्दल सविस्तर माहिती नसते. त्यानी पितृ शांती साठी पुढे दिलेले 3 मंत्र प्रतेकी 21 वेळा व चौथा मंत्र 108 वेळा म्हणावा. असे केल्याने आपल्या पितरांना शांती मिळून त्याचा आशीर्वाद मिळतो.