स्वस्तिक काढण्याचे महत्व व चमत्कारी फायदे
Swastik kadhnyache Mahatva W Chamatkari Fayde In Marathi
स्वस्तिक हे वास्तु दोष साठी खूप उपयुक्त आहे. आपण स्वस्तिक बघतो तेव्हा ते प्रतेक दिशेने समान दिसते. स्वस्तिकला वास्तु दोषाचे प्रतीक मानले जाते. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आतून व बाहेरून स्वतिक लावले तर वास्तुदोष दूर होतो. स्वस्तिकचा प्रयोग केला तर धन वृद्धी, गृहशांती, रोग मुक्ती, वास्तुदोष, घरातील तनाव, अनिद्रा, चिंता ह्या पासून मुक्ती मिळते. आपल्या कडे पद्धत आहे की कोणते सिद्ध नवीन कार्य चालू करण्या अगोदर स्वस्तिक कढतात. ज्योतिष शास्त्रा नुसार स्वस्तिकला मंगल, मान सन्मान, सफलता व प्रगतीचे प्रतीक मानले जाते.
आपण पाहूया स्वस्तिक काढण्याचे काही चमत्कारी फायदे काय आहेत.
The Marathi language video of Swastik Karnyache Mahatva W Chamatkari Fayde can be seen on our YouTube Channel: Swastik Karnyache Mahatva W Chamatkari Fayde
आपल्या घराचे मुख्य दाराच्या बाहेरील व आतील बाजूस कुकवाची पेस्ट बनवून त्याने स्वस्तिक काढावे त्यामुळे घरातील आजारपण, चिंता, दूर होईल पण स्वस्तिक हे 6.5″ ह्या आकाराचे काढावे. तसेच वास्तुदोष सुद्धा निघून जाईल.
आपल्या घरासमोर जर कोणते झाड किंवा खांब असेल तर आपल्या मुख्य दरवाजावर रोज स्वस्तिक काढा त्यामुळे नकारात्मक शक्ति दूर होईल.
आपल्या घरच्या मुख्य दरवाजावर पंचधातूचे स्वस्तिक लावावे पण त्याची प्राण प्रतिष्ठा करून लावावे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येवून लक्ष्मी माता नेहमी प्रसन्न राहते. तसेच लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी पूर्व दिशेला चांदीचे स्वस्तिक बनवून त्यामध्ये नव रत्न लावावे.
तुमचा जर व्यवसाय बिझनेस असेल तर तुमच्या व्यवसायाच्या उत्तर दिशेला हळदीने स्वस्तिक काढावे.
आपल्या घरातील देव्हाऱ्यात आपल्या इष्ट देवतासाठी स्वस्तिक काढून त्यावर आपल्या इष्ट देवांना ठेवावे. किंवा देव्हारा असेल तर देव्हारा असेल तर तेथेपण स्वस्तिक काढावे. आपले देवता प्रसन्न राहतील.
आपण कोणत्यापण इच्छा पूर्तीसाठी पूजा करत असूततर पूजा करते वेळी स्वस्तिक काढून पंच धान्यचा दिवा बनवून लावावा त्यामुळे आपली कार्य पूर्ती होते.
जर आपल्याला रात्री झोपताना वाईट स्वप्न येत असतील किंवा झोपताना खूप बेचेन वाटत असेल तर आपल्या तर्जनीवर झोपण्याच्या अगोदर स्वस्तिक काढावे. जर आपली काही मनोकामना असेल तर देवळात जावून आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी उलटे स्वस्तिक काढावे मग मनोकामना पूर्ण झाल्यावर परत देवळात जावून सरळ स्वस्तिक काढावे.
आपल्या पितरांची आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्या घरात गोबर म्हणजेच शेणानि स्वस्तिक काढावे त्यामुळे घरात पितरांच्या कृपेने सुख, शांती व समृद्धी मिळते.