टेस्टि चीज गार्लिक ब्रेड टोस्ट रेसीपी
Tasty Cheese Garlic Bread Toast Recipe In Marathi
चीज गार्लिक टोस्ट आपण ब्रेकफास्टला किंवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. चीज गार्लिक टोस्ट बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. मुले व मोठी माणसे अगदी आवडीने खातात.
चीज गार्लिक टोस्ट बनवताना प्रथम चीज गार्लिक सॉस बनवून मग त्यापासून टोस्ट बनवले आहेत. टेस्टि चीज गार्लिक टोस्ट बनवताना ओव्हन पाहिजे असे नाही आपण नॉनस्टिक तवा वापरुन सुद्धा बनवू शकतो. टेस्टि चीज गार्लिक टोस्ट आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
The Marathi language video Tasty Cheese Garlic Bread Toast can be seen on our YouTube Channel: Tasty Cheese Garlic Bread Toasthttps://www.youtube.com/watch?v=LHVJBTBk9aE
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
साहीत्य:
8 ब्रेड स्लाईस
2 टे स्पून बटर
गार्लिक सॉस बनवण्यासाठी:
3 टे स्पून बटर
1 टी स्पून चिली फ्लेस्क
8 लसूण पाकळ्या (बारीक चिरून)
1 चीज क्युब (किसून)
1 टी स्पून कोथबिर (बारीक चिरून)
मीठ चवीने
कृती: लसूण सोलून बारीक चिरून घ्या. कोथबिर धुवून बारीक चिरून घ्या. चीज किसून घ्या.
एका बाउलमध्ये बटर, चिली फ्लेस्क, चिरलेला लसूण, केसलेले चीज क्युब, कोथबिर व मीठ चवीने घालून मिक्स करून सॉस तयार करून घ्या.
सॉस तयार झाल्यावर ब्रेड स्लाईसला एका बाजूनी लावून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून त्याला थोडे बटर लावून घ्या. चीज गार्लिक सॉस लावलेली ब्रेड स्लाईस तव्यावर ठेवून छान एका बाजूनी टोस्ट सारखी 3-4 मिनिट अगदी कमी विस्तवावर रोस्ट करून घ्या.
अश्या प्रकारे सर्व ब्रेड स्लाईसला सॉस लावून नॉन स्टिक तव्यावर गरम करून टोस्ट बनवून घ्या.
गरम गरम चीज गार्लिक ब्रेड टोस्ट चहा बरोबर किंवा कॉफी बरोबर सर्व्ह करा.