टेस्टी स्टफ मसाला एग्स रेसिपी इन मराठी
Tasty Spicy Masala Stuffed Eggs Recipe In Marathi
टेस्टी स्टफ मसाला एग्स बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण जेवणात किंवा ऑफिसला जाताना डब्यात न्यायला सुद्धा मस्त आहे. अगदी कमी वेळात आपण ही डिश बनवू शकतो. गरम गरम चपाती किंवा पराठा बरोबर सुद्धा आपण सर्व्ह करू शकतो. अंडी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. Sunday Hoya Monday Roj Khawo Ande असे म्हणतात. टेस्टी स्टफ मसाला एग्स बनवताना अंडी उकडून त्यामध्ये मसाला भरून बनवली आहेत.
The Marathi language video of Tasty Spicy Masala Stuffed Eggs can be seen on our YouTube Channel: Tasty Spicy Masala Stuffed Eggs
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहीत्य:
2 अंडी (उकडून)
1 ½ टे स्पून तेल
2 मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरून)
1 टे स्पून आले-लसूण पेस्ट
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून लाल मिरची पावडर
½ टी स्पून धने-जिरे पावडर
¼ टी स्पून गरम मसाला (हवा असेल तर)
2 टे स्पून कोथबिर चिरून
मीठ चवीने
कृती:
प्रथम अंडी उकडून घ्या. कांदा चिरून घ्या, आले-लसूण पेस्ट करा, कोथबिर चिरून घ्या.
एका कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, गरम मसाला, मीठ घालून कोथबिर घालून परतून घ्या.
आता मसाला तयार झाला. उकडलेली अंड्याला मधोमध 3/4 “ चीर द्या. मग त्यामध्ये बनवलेला थोडा मसाला भरा. मसाला भरलेली अंडी आता कढईमद्धे ठेवून हळुवार पणे हलवा, अंडी तुटता कामा नये. अंडी गरम झाल्यावर विस्तव बंद करा.
गरम गरम अंडी पराठा किंवा चपाती बरोबर सर्व्ह करा.