स्वादिष्ट मुगाच्या डाळीचे पराठे मुलांच्या डब्यासाठी
Tasty Spicy Moong Dal Paratha For Kids Tiffin Recipe In Marathi
मुग डाळ ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. मग डाळ पचायला हलकी असते. मग डाळ ही तिच्या गुणामुळे श्रेष्ट समजली जाते. मग डाळ पचायला हलकी असते.
मूग डाळीचे पराठे मुळे अगदी आवडीने खातात. मुलांना डब्यात द्यायला अश्या प्रकारचा पराठा मस्त आहे. अश्या प्रकारचा पराठा बनवताना मुगाची डाळ शिजवून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मस्त पौस्टीक पराठे बनवता येतात. अश्या प्रकारचे पराठे झटपट व टेस्टी होतात. टोमॅटो सॉस बरोबर आपण सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of Tasty Spicy Moong Dal Paratha For Kids Tiffin can be seen on our YouTube Channel: Tasty Spicy Moong Dal Paratha For Kids Tiffin
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी 4 जणासाठी
साहीत्य:
1 कप मुगाची डाळ (शिजवून)
1 ½ कप गव्हाचे पीठ
1 टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
¾ टी स्पून लाल मिरची पावडर
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून ओवा
½ टी स्पून धने-जिरे पावडर
2 टे स्पून कोथबिर व पुदिना
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
तेल व तूप वरतून लावायला
कृती: मुगडाळ स्वच्छ धुवून पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या. कोथबिर व पुदिना धुवून चिरून घ्या.
एका भांड्यात गव्हाचे पीठ, शिजलेली मुगाची डाळ, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, ओवा, लाल मिरची पावडर, हळद, धने -जिरे पावडर, कोथबिर व पुदिना, मीठ चवीने घालून मिक्स करून घ्या. मग पीठ चांगले मळून घेऊन 15 मिनिट झाकून ठेवा.
मग मळलेल्या पिठाचे एक सारखे गोळे बनवून घ्या. तवा गरम करायला ठेवा. एक गोळा घेऊन छोटा पराठा लाटून घ्या. तवा गरम झाल्यावर त्यावर पराठा घालून तेल घालून दोन्ही बाजूनी चांगला भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून घ्या.
गरम गरम मुगाच्या डाळीचा टेस्टी पराठा तूप लावून टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.