तीन चमचे तुपात डिलीशियस चना डाळ हलवा किंवा शिरा
Tin Chamche Tupat Delicious Chana Dal Halwa Recipe In Marathi
चनाडाळीचा हलवा किंवा शिरा आपण अगदी झटपट बनवू शकतो. चनाडाळीचा हलवा किंवा शिरा स्वादिष्ट लागतो. आपण सनावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच चनाडाळ भिजवून आपण अश्या प्रकारचा हलवा बनवतो त्यामुळे पचायला सुद्धा हलका आहे.
चनाडाळ हलवा आपण अगदी कमी तुपात छान खमंग बनवू शकतो. आपण रवा वापरुन शिरा बनवतो राव्याच्या शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर चनाडाळ वापरुन शिरा बनवा नक्की सगळ्यांना आवडेल. तसेच कोणी पाहुणे येणार असतील तर अश्या प्रकारचा शिरा बनवा अगदी नवीन पद्धतीने.
The Marathi language video of Tin Chamche Tupat Delicious Chana Dal Halwa can be seen on our YouTube Channel : Tin Chamche Tupat Delicious Chana Dal Halwa
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहीत्य:
1 कप चनाडाळ
3 टे स्पून तूप
4 टे स्पून फ्रेश क्रीम
2 ½ कप दूध (कोमट)
1 कप किंवा त्यापेक्षा थोडी कमी साखर
½ टी स्पून वेलची पावडर
ड्राय फ्रूट सजावटीसाठी
कृती: प्रथम चनाडाळ स्वच्छ धुवून 5 तास भिजत घाला. मग सर्व पाणी काढून एक टॉवेलवर डाळ ठेवून पुसून घ्या.
एका कढईमद्धे दोन टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये चनाडाळ घालून गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्या. चनाडाळ परतून झाल्यावर विस्तव बंद करून चनाडाळ मिक्सर च्या भांड्यात घेऊन पाणी न घालता जाडसर वाटून घ्या.
कढमध्ये एक चमचा तूप गरम करून त्यामध्ये वाटलेली चनाडाळ घेऊन परत 2-3 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग त्यामध्ये 4 टे स्पून फ्रेश क्रीम व किसमिक्स घालून मिक्स करून त्यामध्ये हळू हळू कोमट दूध घालत जा व मिक्स करत रहा अश्या प्रकार 2 ½ कप दूध घालून मिक्स करत रहा. चनाडाळ शिजली की त्यामध्ये साखर व वेलची पावडर घालून मिक्स करून 2-3 मिनिट वाफ येवू द्या.
गरम गरम हलवा बाउलमध्ये काढून ड्रायफ्रूटने सजवून सर्व्ह करा.