विड्याच्या पानाचे औषधी गुणधर्म उपयोग किंवा नुकसान
Amazing Benefits of Betel Leaf And Side Effects In Marathi
भारतात पान खाणारे खूप शोकिन आहेत व तसेच भारतात पान खाण्याची परंपरा फार पूर्वी पासून आहे. पान खाताना पांनाची पान व त्यातील सुपारी ह्याला महत्व आहे. पानाचा उपयोग हा पूजेसाठी तसेच खाण्यासाठी सुद्धा केला जातो.
The Marathi language video of Amazing Benefits of Betel Leaf And Side Effects can be seen on our YouTube Channel of: Amazing Benefits of Betel Leaf And Side Effects
पान खाण्याचे औषधी गुणधर्म खूप आहेत. त्यामुळे आपल्या शरीरातील बरेच रोग बरे होण्यास मदत होते. तसेच त्या बरोबर पान खाण्याचे काही तोटे सुद्धा आहेत.
विडयाच्या पान रुची उत्पन्न करणारी, तीक्ष्ण, गरम, तुरट, पोट स्वच्छ करणारी, तिखट, कडवट, खारट, रक्त व पित्त कारक, बल कारक, तसेच कफ, तोंडाची दुर्गंधी, दूर करणारी आहे.
आपण पाहूया पान खाण्याचे फायदे काय आहेत.
पान खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. पानांमध्ये जे पोषक तत्व आहेत ते आपल्या आरोग्यासाठी फायदेमंद आहेत. आपल्या शरीरातील टॉक्सिन नष्ट करण्याचे गुणधर्म आहेत तसेच एंटीऑक्सीडेंट सारखे गुण आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पाना मध्ये एंटी-डायबिटिक, एंटीइंफ्लेमेटरी, एंटी-कैंसर, हृदय स्वस्थ ठेवण्याचे गुण असून एंटी-अल्सर सारखे सुद्धा गुण आहेत.
पाना मध्ये अजून काही महत्वाचे गुणधर्म आहेत
खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा किंवा सर्दी झाली असेल तर 2-3 पाने तशीच चावून खावी. तसेच पानाची देठ मधा मध्ये घालून चूर्ण बनवून खल्याने खोकला थांबतो.
मधुमेह असणाऱ्याना पान खाणे खूप फायदेमंद आहे.
पानामध्ये एंटी हाइपोग्लाइसेमिक गुण आहेत त्यामुळे रक्तातील ग्लुकोज कमी होते. त्यामुळे डायबीटीज नियंत्रणात राहते.
पचनशक्ती चांगली होते
आपल्या शरीराची पचनशक्ती चांगली होण्याचे गुणधर्म त्यामध्ये आहेत. ,म्हणून जेवण झाल्यावर पान खाणीचे परंपरा आहे. त्यामुळे आपले शरीरपण चांगले राहते. भूक सुद्धा लागते.
तोंडात जर छाले पडले असतील तर पान खावे कारण पानांमध्ये एंटी-अल्सर चे गुण आहेत. पानांमध्ये एंटी कैंसर गुण आहेत त्यामुळे ट्यूमर वाढण्या पासून रोकले जाते. तसेच कॅन्सर होण्यास रोकले जाते.
आपण जेवण झाल्यावर पान खातो. पण पान खाताना पानाला चुना लावतात व कात, वेलची, धण्याची डाळ, बडीशेप, सुपारी, लवंग, असे पदार्थ घातले जातात. चुना हा वात-कफकारक आहे. व कात-कफ पित्तहारक आहे. तसेच पान खाण्याने मन प्रफुलीत बनते.
पानावर थोडे एरंडीचे तेल चोळून थोडेसे गरम करून लहान मुलांच्या छातीवर ठेवून हलका शेक दिल्याने छातीतील कफ निघून जातो. डोके दुखत असेलतर पान वाटून त्याचा रस डोक्यावर लावावा.
बाळंतिनिला एकदम भरपूर दूध येते त्यामुळे स्तन दुखू लागतात व सुजतात तर पाने थोडी गरम करून स्तनावर बांधल्यास साचलेले दूध निघून जाते व सूज उतरून वेदना कमी होतात.
आता आपण पाहू या पान खाण्याचे दुष्परिणाम काय होतात.
दिवसभर पान खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही. पान ख्यालयाने तोंडात खूप लाळ सुटते. मग थुकण्याची सवय लागते. मुख शुद्धीसाठी पान खाणे योग्य असले तरी जास्त प्रमाणात खाऊ नये त्यामुळे दात लाल होतात. दातांची मुळे ठिसुळ होतात. दातांना कीड लागून दात खराब होतात. पायोरीया नावाचा रोग होऊ शकतो.
पानाचा जास्त सेवन करणे म्हणजे दातांचे रोग, नेत्र रोग, बलाचा क्षय व मुखरोग होऊ शकतो. पानाचे अतिसेवन केलेतर कर्करोग होण्याचा संभव असतो रक्तात विषारी घटक शिरतो. कातामुळे फुफुसात शुष्कता व आतडयामद्धे विकृती निर्माण होते. शरीराला कंड सुटते झोपण्या पूर्वी तोंड स्वच्छ धुवावे.
अजून एक खास टीप आहे ती म्हणजे पानाचे टोक, देठ व शिर कधी खाऊ नये. कारण पानाच्या टोकाशी आयुष, मुळाशी यश व मध्यभागी लक्ष्मीचा वास असतो. पानाची शिर खालीतर बुद्धी नष्ट होते असे म्हणतात.