घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कासव ठेवण्याचे चमत्कारी लाभ व जागा
Amazing Benefits of Keeping Tortoise At Home in Marathi
फेंगशूई व धार्मिक मान्यता नुसार आपल्या घरात, कामाच्या ठिकाणी, दुकानात, बिझनेस च्या ठिकाणी कासव ठेवणे हे लाभदायक आहे. कासव ठेवल्याने आपल्या परिवारातील सदस्या मध्ये सकारात्मक प्रभाव पडतो फेंगशूई च्या नुसार कासव घरात ठेवणे म्हणजे घरातील सदस्यांचे आयुष्य वाढते, घरात सुख-शांती राहते. तसेच बिझनेस साठी शुभ मानले जाते.
The Marathi language video of Amazing Benefits of Keeping Tortoise At Home be seen on our YouTube Channel of: Amazing Benefits of Keeping Tortoise At Home
आता आपण पाहू घरात किंवा कामाच्या जागी कासव कसे ठेवायचे व त्याचे काय फायदे आहेत.
हिंदू धर्मात कासवाला शुभ व सुख समृद्धीचे प्रतिक मानले जाते. आपल्या पुराणात सुद्धा कासवा उल्लेख केलेला आहे. करणकी भगवान विष्णु ह्यांनी स्वतः कासवाचे रूप धरण केले होते. समुद्रमंथनच्या वेळी भगवान विष्णु यांनी कासावाचे रूप धरण करून मंद्राम चल पर्वताला आपल्या कवचावर घेतले होते. म्हणूनच आपल्या घरात व व्यापाराच्या ठिकाणी कासव ठेवणे शुभ मानले जाते.
घरात कासव अश्या प्रकारे ठेवा.
कासव हे दीर्घायुषी आहे तसेच तो एक शांत जीव आहे. कासवाचा फोटो किंवा अष्टधातूचे कासव देवघरात ठेवू शकता. कासव हे पितळ किंवा अष्टधातू च्या ताटात ठेवणे इष्ट आहे.
आपल्या घरच्या किंवा व्यवसायाच्या मुख्य दरवाजावर कासावचे चित्र लावावे.
वास्तू शास्त्रानुसार उत्तर दिशा ही शुभ मानली जाते. उत्तर दिशा ही लक्ष्मी माताची दिशा मानली जाते म्हणून कासव हे उत्तर दिशेला ठेवणे लाभदायक आहे. त्यामुळे धनलाभ व शत्रूचा नाश होतो. घर व दुकानच्या मुख्य दारावर कासवचे चित्र लावल्याने धनलाभ व सफलता मिळते. ज्याना कोणाला धन संबंधतीत अडचण आहे त्यानी क्रिस्टल चे कासव जरूर आणावे.
कासव बेडरूममध्ये कधी ठेऊ नये.
फेंगशुई च्या तंत्रानुसार आपल्या बेडरूममध्ये कासव कधी ठेवू नये. कारण त्यामुळे उलटा प्रभाव होऊ शकतो. कासव ठेवण्याचे चांगली जागा म्हणजे ड्रॉइंग रूम म्हणजे हॉल आहे. घरात ठेवणाऱ्या कासवाचे तोंड घराच्या आतील बाजूस असावे.
आयुष्यमान वाढते.
घरात कासव ठेवल्यामुळे घरातील व्यक्तीचे आयुष्यमान वाढते. कारणकी कासव हे बरेच वर्ष जिवंत राहते. त्यामुळे घरातील महिलांच्या सौभाग्यमध्ये वृद्धी होते. म्हणून घरात व ऑफिसमध्ये कासव ठेवणे लाभदायक आहे.
घरामध्ये शांती राहते.
ज्यांच्या घरातील परिवारात वादविवाद किंवा भांडण आहे त्यानी घरात दोन कासवची जोडी ठेवावी. अश्याने घरातील भांडण किंवा वाद विवाद नष्ट होऊन शांती राहून प्रेम वाढते. तसेच वाईट शक्ति व क्लेश दूर होतात.
घरात कासव ठेवल्याने वाईट नजर व आजारपण येत नाही
फेंगशूई च्या तंत्रा नुसार कासव घरात ठवले तर आपल्या घरावर कोणची पण वाईट नजर लागत नाही. कासव वाईट नजर दोष नष्ट करते. घरात कोणाची प्रकृती बऱ्याच काळा पासून ठीक नसेल तर घरामध्ये कासव दक्षिण पूर्व दिशेला ठेवणे योग्य आहे. त्यामुळे चांगले लाभ मिळतील. घरात कासव ठेवल्यामुळे घरातील वातावरण शुद्ध व पवित्र राहते. तसेच वाईट आजार घरात येत नाहीत.
सकारात्मक ऊर्जा घरात येते
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नोकरीम धंदा ह्यामध्ये खूप स्पर्धा आहेत त्यामुळे खूप कष्ट करावे लागतात. त्यासाठी कासव हे खूप शुभ आहे. तसेच जे विद्यार्थी परीक्षा व स्पर्धा साठी तयारी करीत आहेत त्यानी पितळी कासव पाण्यामध्ये ठेवावे त्यामुळे त्यांना नक्की यश मिळेल. कासवा पासून मिळणारी सकारात्मक ऊर्जा नक्की काम करेल.
संतती प्राप्ती:
वस्तु शास्त्र व फेंगशूई च्या तंत्रा नुसार ज्या कासवाच्या पाठीवर त्याचे मूल आहे ते कासव संतती प्राप्ती साठी खास मानले जाते. ज्या घरात संतती नाही किंवा ज्या दाम्पत्याला संतती सुख नाही त्यानी अश्या प्रकारचे कासव घरात ठेवले पाहिजे असे म्हणतात की त्या घरात मग लवकर संततीसुख मिळते.
कासव नेहमी पाण्यात ठेवावे. तसेच धातू किंवा तांब्याचे कासव पूर्णिमा ह्या दिवशी खरेदी करून आणून कच्या दुधात बुडवून ठेवावे. नंतर एखादा शुभ मुहूर्त पाहून दुधातून काढून स्वच्छ पाण्याने धुवून तांब्याच्या किंवा काचेच्या प्लेट मध्ये थोडे पाणी घेऊन त्यात ते कासव ठेवावे. त्यासाठी उत्तर पूर्व कोपरा किंवा दिशा योग्य आहे. रोज पाणी बदलले तरी चालते.