फक्त एक दिवा लावा व त्याचे चमत्कार पहा
Amazing Benefits Of lighting Diya At Home In Marathi
आपण देवा समोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावतो. देवा समोर दिवा लावल्याने आपल्याला मनशांति मिळते तसेच घरात सुद्धा सुख शांती राहते.
प्रतेक देवा समोर विशिष्ट तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावल्याने त्याचे चमत्कारी लाभ होतात. तसेच दिवा लावताना किती वातीनचा दिवा लावायचा ते खाली सांगितले आहे. दिवा लावताना पूर्ण श्रद्धेने लावला तर त्याचे फळ सुद्धा आपल्याला लवकर मिळते. म्हणजेच लक्ष्मी प्राप्ती, शत्रू पिडा पासून मुक्ती, आजारपण दूर होते, देवाची कृपा होते, पती-पत्नी मध्ये वादविवाद मिटतात.
The Marathi language video Amazing Benefits Of lighting Diya At Home be seen on our YouTube Channel of: Amazing Benefits Of lighting Diya At Home
1. आर्थिक प्राप्ती चांगली होण्यासाठी रोज देवा समोर शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे.
2. शस्त्रू पिडा पासून सुटका होण्यासाठी भैरव देवा समोर सरसूच्या तेलाचा दिवा लावावा.
3. भगवान सूर्य देवाची पूजा करताना नेहमी तुपाचा दिवा लावावा.
4. शनि देवा समोर नेहमी सरसूच्या तेलाचा दिवा लावावा.
5. आपल्या पतीच्या दीर्घ आयुषासाठी गिलोय च्या तेलाचा दिवा लावावा.
6. राहू तथा केतू ह्या ग्रहासाठी अलसीच्या तेलाचा दिवा लावावा.
7. कोणत्या ही देवी देवतांची पूजा करताना गाईच्या शुद्ध तुपाचा फूल वातीचा दिवा लावावा किंवा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
8. जगदंबा माता, दुर्गा माता ह्याची आराधना करताना किंवा सरस्वती माताची आराधना करताना किंवा शिक्षा प्राप्तीच्या वेळी दोन वातीचा दिवा लावावा.
9. श्री गणेशजीची पूजा करताना व त्यांची कृपा मिळण्यासाठी तीन वातीचा तुपाचा दिवा लावावा.
10. भैरव देवाची साधना करताना चार वात असलेला सरसूच्या तेलाचा दिवा लावावा.
11. कोर्टात केस चालू असेलतर पाच वात असलेला दिवा लावावा.
12. कार्तिक भगवान ह्याची खुश करायचे असेल तर गाईच्या तुपाचा पाच वात असलेला दीवा लावावा.
13. शंकर भगवान ह्यांना प्रसन्न करायचे असेलतर पिवळ्या सरसूच्या तेलाचा आठ किंवा बारा वात असलेला दिवा लावावा.
14. भगवान विष्णु ह्यांना प्रसन्न करण्यासाठी 16 वातीनच दिवा लावावा.
15. लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी सात वातीचा दिवा लावावा.
16. जर पती-पत्नी मध्ये वादविवाद होत असतील तर शंकर-पार्वती किंवा विष्णु-लक्ष्मी ह्याच्या समोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा.
17. जर घरात कोणी आजारी आहे व आजार बारा होत नसेल तर घराच्या मुख्य दरवाजा बाहेर सरसूच्या तेलाचा दिवा लावावा. पण आपल्या डॉक्टर इलाज चालू ठेवा.