Amazing Health Benefits of Lemongrass And Lemon Grass Tea In Marathi

Amazing Health Benefits of Lemongrass And Lemon Grass Tea
Amazing Health Benefits of Lemongrass And Lemon Grass Tea

शरीरातील टॉक्सिन काढून शरीर निरोगी बनवून रोगप्रतिकार शक्ति वाढवते आरोग्यदाई गवती चहा

Amazing Health Benefits of Lemongrass And Lemon Grass Tea In Marathi

गवती चहा पिण्याचे आश्चर्यकारक गुणधर्म आहेत. गवती चहा आपल्या सर्वाचा परिचयाचा आहे. गवती चहालाच इंग्लिश मध्ये लेमन ग्रास म्हणतात. गवती चहाचे बरेच औषधी गुणधर्म आहेत. गवती चहामध्ये एंटी ऑक्सिडेंट व एंटी फंगल हे महत्वाचे गुणधर्म आहेत. बरेच जणांचे असे म्हणणे आहे की गवती चहाचे नियमित सेवन केलेतर डायबीटीस, शरीराचा स्थूलपणा, पोटा संबंधी तक्रारी, झोपेच्या तक्रारी किंवा श्वास संबंधी तक्रारी दूर होतात.

The Marathi language video of Amazing Health Benefits of Lemongrass And Lemon Grass Tea can be seen on our YouTube Channel of : Amazing Health Benefits of Lemongrass And Lemon Grass Tea

आता सध्या फार मोठ्या महामारीच्या रोगाला आपल्याला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी आपल्याला रोग प्रतिकार शक्ति वाढवण्याची गरज आहेत. त्यासाठी इम्युनिटी बूस्टर म्हणून गवती चहाचा वापर करणे फायदेशीर आहे. आपली रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी लोक लेमन ग्रास म्हणजेच गवती चहा घालून चहा बनवून त्याचे सेवन करत आहेत. रोग प्रतिकार शक्ति वाढलीकी सर्दी, खोकला, होत नाही हा एक रामबाण उपाय आहे. ह्याच्या व्यतिरिक्त त्याचे औषधी गुणधर्म आहेत त्याच्या पासून तेल काढून औषध बनवली जातात.

Amazing Health Benefits of Lemongrass And Lemon Grass Tea
Amazing Health Benefits of Lemongrass And Lemon Grass Tea

लेमन ग्रास मध्ये सिट्रेल ए व बी असे रासायनिक तत्व आहेत त्यामुळे त्याच्या पासून तेल काढून सौंदर्य प्रसाधने, मच्छर पळवण्याच्या कॉईल्स व परफ्यूम बनवली जातात. तसेच त्यामध्ये एल्फा पिनाइन व बीटा पिनाइन असे रासायनिक गुण आहेत त्यापासून विटामीन ए बनवण्याचे काम करतात.

गवती चहा चा सुगंध हा लिंबा सारखा आहे म्हणून त्याला लेमन ग्रास असे म्हणतात विज्ञानिकांच्या मते लेमन ग्रास मध्ये एंटीऑक्‍सीडेंट, एंटी-इंफ्लेमेंटरी, एंटी-सेप्टिक व विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. तसेच त्यामध्ये कैल्शियम, आयर्न, मैग्नीशियम, फास्फोरस, प्रोटीन, फैट, कार्बोहाइड्रेट, मिनरल, पोटैशियम, सोडियम, जिंक, कॉपर, मैंगनीज, विटामिन बी-6, विटामिन सी, विटामिन ए असे गुण आहेत. ह्या मध्ये कॅन्सरच्या बरोबर अजून बऱ्याच रोगांवर गुणकारी आहे. लेमन ग्रासच्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत होते. ह्या मध्ये ब्रेस्ट कॅन्सर व स्किन कॅन्सर वरती खूप फायदेमंद आहे. आर्थराइटिस च्या समस्या पासून सुद्धा आराम मिळतो.

आपण गवती चहाचे जसे चांगले गुणधर्म पाहिले पण हे गुणधर्म सर्वाना फायदेमंद होतील असे नाही कारण की प्रतेकांची प्रकृती ही निराळी असते. ज्याना हे उपयोगी पडेल त्यानीच ह्याच वापर करावा.

ज्याना हाय ब्लड प्रेशर आहे त्यानी डॉक्टरचा सल्ला घेऊन मगच लेमन ग्रास वापरावे. काही जणांना ह्याची एलर्जी सुद्धा असते म्हणजेच अंगाला खाज येणे, गळ्याला सूज येणे. ज्या महिला गर्भवती आहेत किंवा बाळाला स्तनपान करतात त्यानी ह्याचा वापर टाळावा. कारण की ह्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

गवती चहाचा अति वापर करणे म्हणजे चक्कर येणे किंवा जास्ती लघवीला होणे किंवा अशक्त पणा येणे अश्या गोष्टीला सामोरे जावे लागते म्हणून कोणत्या सुद्धा गोष्टीचा अतिरेक करू नये.

लेमान ग्रास आपण चहा बनवताना घालू शकतो किंवा आजकाल कोविड 19 मध्ये काढा बनवून घेतला जातो त्यामध्ये सुद्धा वापर करू शकता. तसेच सुकलेल्या गवती चहाच्या काड्या आपण एका कापडात ठेवून त्याची छोटीशी पोटली बनवून कपाटात किंवा दिवाणमध्ये सुद्धा ठेवू शकतो. त्यामुळे किडे येत नाहीत

गवती चहाचा चहा आपण दोन पद्धतीने बनवू शकतो. चहाचे प्रमाण दोन जणासाठी

पहिल्या पद्धतीमध्ये
3 कप पाणी
2 टे स्पून गूळ
½” आले तुकडा
1 टी स्पून चहा पावडर
6 गवती चहाचे तुकडे
1 टी स्पून लिंबूरस (पाहिजे असेल तर)

कृती: एका भांड्यात पाणी, आले ठेचून,गूळ, गवती चहा पाने, चहा पावडर घालून 5 मिनिट मंद विस्तवावर उकळून घ्या. मग गाळून लिंबुरस घालून मिक्स करा. गरम गरम चहा सर्व्ह करा. (चहा पावडर कमीच टाका नाहीतर चहा कडवट होतो तसेच ह्यामध्ये दूध घातले नाही.)

दुसरी पद्धत:
2 कप पाणी
1 कप दूध
4 टी स्पून साखर (कमी टाकली तरी चालेल)
2 टी स्पून चहा पावडर
½” आले तुकडा
5-6 गवती चहाच्या पानाचे तुकडे
कृती: एका भांड्यात पाणी, साखर, आले ठेचून, गवती चहाच्या पानाचे तुकडे व चहाची पावडर मंद विस्तवावर चहा उकळून मग त्यामध्ये दूध घालून गरम करून घ्या.
गरम गरम चहा सर्व्ह करा.

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.