दही-भात खाण्याचे चमत्कारी आरोग्यदाई फायदे
Dahi-Bhat (Curd Rice) Khanyache Chamatkari Arogya Dai Fayde in Marathi
दही खाणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेमंद आहे, आपण भाता बरोबर दही कधी खाले आहे का? दही व भात बरोबर सेवन केल्याने त्याचे खूप फायदे होतात. आपण म्हणतो की भात खल्याने शरीराचे वजन वाढते पण भाता बरोबर दही सेवन केल्याने वजन वाढण्याच्या आयवजी कमी होते.
The Marathi language video of Dahi-Bhat (Curd Rice) Khanyache Chamatkari Arogya Dai Fayde in Marathican be seen on our YouTube Channel of: Dahi-Bhat (Curd Rice) Khanyache Chamatkari Arogya Dai Fayde in Marathi
आता आपण पाहू या दही-भात खालयाने काय फायदे होतात.
शरीराचे वाढलेले वजन कसे कमी करायचे
आपले शरीराचे वाढलेले वजन कमी करायचे असेलतर रोज भात बनवताना भांड्यात बनवून जास्तीचे पाणी काढून टाका व त्या भातामद्धे दही मिक्स करून सेवन करा. असे 1-2 महीने रोज करा त्यामुळे शरीराला कमी कॅलरी मिळतील व वजन कमी होईल.
दही-भातामध्ये प्रोटिन आहे.
दहीमध्ये कॅल्शियम च्या बरोबर प्रोटिन हे अधिक प्रमाणात आहेत. तसेच त्यामध्ये एंटीऑक्सीडेंटचे गुण आहेत. दही-भात खालयाने आपल्या शरीराला बरेच फायदे होतात.
पोटदुखी वर गुणकारी:
भातामध्ये मैग्नीशियम व पोटैशियम असते. जर पोट दुखी असेल तर दहीभात जरूर खावा. त्यामुळे पोट दुखी कमी होण्यास मदत होते. दहीभात सेवन केल्याने महिलांच्या मासिक पाळीच्या अगोदर पोट दुखी होते ती होत नाही.
पचनशक्ती चांगली होते.
दक्षिण भारतात रोज जेवण झाल्यावर दहीभात सेवन करण्याची पद्धत आहे त्यामुळे आपले जेवण चांगले पचते. दहीमध्ये बैक्टीरिया आहे त्यामुळे पचन होण्यास चांगली मदत होते. तसेच आपले पोट सुद्धा चांगले साफ होते.
इम्युनिटी चांगली वाढते.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स आहे त्यामुळे शरीरातील इम्युनिटी वाढण्यास मदत होते. तसेच शरीराला रोगा पासून लढण्यास मदत मिळते. म्हणून आपण आपल्या जेवणात जेव्हडे दही सेवन कराल तेव्हडी रोग प्रतिकार शक्ति वाढेल.
मानसिक तनाव कमी करते.
दह्याच्या सेवनाने तनाव कमी होतो व आपला मूड सुद्धा चांगला बनतो. दह्यामध्ये प्रोबायोटिक बैक्टीरिया आहे त्यामुळे तनाव कमी होतो.
शरीरातील ताप कमी होण्यास मदत होते.
खर म्हणजे लोकांची अशी समजूत आहे की शरीरात ताप असेल तर दहीभात खाऊ नये पण शरीरात जेव्हा ताप असेल तेव्हा दहीभात जरूर खावा. त्याने भूक लागून शरीराला ऊर्जा मिळते.
दहीभात खालयाने मेदूची कार्य क्षमता वाढते. मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रीप्टोफॅन नावाचे रसायन दह्यामध्ये आहे.
आता आपण पाहू या दही-भात कसा बनवायचा
साहीत्य:
1 वाटी दही (ताजे)
1 ½ वाटी भात (शिजलेला)
1 चमचा साखर (पिठीसाखर)
मीठ चवीने
फोडणी करिता:
1 टे स्पून तूप किंवा तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
1 चिमूट हिंग
1 टी स्पून उडीदडाळ (साऊथमध्ये घालतात नाही घातली तरी चालेल)
7-8 कडीपत्ता पाने
2 लाल सुक्या मिरच्या
1 टे स्पून कोथबिर
सजावटीसाठी डाळींबाचे दाणे किंवा उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे
कृती:
प्रथम मऊ भात शिजवून घ्या. (ह्यासाठी कोरडा भात चांगला लागत नाही). एका बाउलमध्ये दही, पिठीसाखर व मीठ मिक्स करून घ्या. गुठळी राहता कामा नये. मग दही व भात मिक्स करून घ्या. समजा कोरडे वाटले तर थोडेसे दूध वापरा.
फोडणी करिता तूप किंवा तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, उडीदडाळ, हिंग, कडीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घालून खमंग फोडणी भातावर घालून त्यावर कोथबिर घालून मिक्स करून घ्या.
सजावटीसाठी आपण डाळींबाचे दाणे किंवा उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे घालू शकतो.