नवरात्रि अष्टमी पूजा महत्व, कन्या पूजन, लाभ व मंत्र
Durga Ashtami 2020 Puja Vidhi Mantra And Kanya Pujan In Marathi
नवरात्रीच्या दिवसांत आठवा दिवस हा खूप महत्वाचा आहे आठव्या दिवसाला महाष्टमी किंवा दुर्गाष्टमी ह्या नावांनी सुद्धा ओळखले जाते. माता दुर्गाचे आठवे रूप म्हणजे महागौरी तीची पूजा ह्या दिवशी केली जाते. पूजा केल्याने आपल्याला आपल्या सगळ्या पापातून मुक्ती मिळते. माता पार्वतीने बरेच वर्ष तप केल्यामुळे तिला गोरा रंग प्राप्त झाला होता. भगवान शिव हयाणी माता पार्वतीला गोरा रंग वरदानामध्ये दिला होता. म्हणून तिचे नाव महागौरी असे पडले.
The Marathi language video of Durga Ashtami 2020 Puja Vidhi Mantra And Kanya Pujan be seen on our YouTube Channel of: Durga Ashtami 2020 Puja Vidhi Mantra And Kanya Pujan
अष्टमीच्या दिवशी माता महागौरी ची पूजा केल्याने सौभाग्य प्राप्ति होते. त्याच बरोबर सुख-समृद्धि मिळते. महाष्टमी ह्या दिवशी कन्या पूजन केले जाते. कन्या ह्या माता दुर्गाचे साक्षात स्वरूप आहे. म्हणून अष्टमीच्या दिवशी कन्या पूजन करतात.
कशी करायची महागौरीची पूजा
महागौरी ची पूजा करताना पिवळ्या रंगाचे वस्त्र घालून माता महागौरीच्या फोटो किंवा मूर्तीच्या समोर दिवा, आगरबती लाऊन माताचे ध्यान करून माताला पांढरी किंवा पिवळी फूल अर्पण करून पुढे दिलेला मंत्र जाप करावा.
अष्टमीच्या दिवशी कुमारिकांना भोजन देण्याची परंपरा आहे.
नवरात्रि मध्ये कुमारिकांना भोजन द्यायची परंपरा आही. म्हणून अष्टमीच्या दिवशी कुमारिका मुलींचे पूजन केले जाते. खरंहणजे नवरात्री मध्ये रोज कुमारिकाची पूजा केली जाते. कुमारिका म्हणजे वय वर्ष 2 ते 9 वर्ष ह्या वयातील मुलींची पूजा केली जाते. प्रेतक वर्षाच्या मुलीचे देवीचे रूप निराळे आहे.
माता महागौरीची पूजा महत्व:
जीवनात आपल्याला अनेक संकटे येतात. ती दूर करण्यासाठी तसेच पापापासून मुक्ती मिळण्यासाठी माता महागौरीची पूजा केली जाते. त्यामुळे आपली संकट दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.
माता महागौरी बीज मंत्र
श्री क्लीं ह्रीं वरदायै नम:।
महागौरी मंत्र
ॐ देवी महागौर्यै नमः।
कुमारिका पूजन कसे करावे
आपल्या सामर्थ्यनुसार आपण नऊ दिवस किंवा शेवटच्या दिवशी कुमारिका पूजन करावे. मुलीना जेवणाचे आमंत्रण द्यावे. त्याना पाटावर किंवा आसनावर बसवून ऊँ कौमार्यै नम: ह्या मंत्राचा उच्चार करत त्यांची पूजा करावी. त्यानंतर जेवायला काढून जेवणात गोड पदार्थ करावा. जेवण झाल्यावर मुलींची पद्यपूजा करावी. तसेच त्यांना भेट वस्तु द्यावी.
कुमारिका पूजन केल्याने खालील विविध लाभ होतात.
पूजा करताना 7 किंवा 9 कुमारिकांचे पूजन केले जाते. व 1 मुलगा हनुमान म्हणून त्याची पण पूजा केली जाते.
हिंदू धर्मा नुसार अष्टमी किंवा नवमी ह्या दिवशी मुलींचे म्हणजेच कुमारिकांचे पूजन करण्याला विशेष महत्व आहे. कुमारिकांचे वय २ ते 9 वर्ष असावे. शास्त्रानुसार मुलीच्या प्रतेक वयानुसार वेगवेगळ्या देवीचे स्वरूप सांगणयात आले आहे. स्त्री ही दिवीचे रूप आहे त्यामुळे तिला नेहमी सन्मान द्यावा. हाच त्यामागचा हेतु आहे.
कुमारिकांचे पूजन केल्यास काय फळ प्राप्त होते
१. २ वर्षाच्या मुलीला स्कंधा म्हणतात तिची पूजा केल्याने गरीबी दूर होते.
२. ३ वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणजेच दुर्गा, लक्ष्मी व सरस्वतीचे रूप म्हणतात. तिची पूजा केल्यास धर्म व काम प्राप्ती होऊन आपला वंश पुढे वाढत जातो.
३. ४ वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात तिची पूजा केल्यास सर्व प्रकारचे सुख मिळते.
४. ५ वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात तिचि पूजा केल्यास सर्व रोगांचा नाश होतो.
५. ६ वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात तिची पूजा केल्यास शास्त्रूचा नाश होतो.
६. ७ वर्षाच्या मुलीला चंडीका म्हणतात. तिची पूजा केल्यास धन व ऐश्वर्य प्राप्त मिळते.
७. ८ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात तिची पूजा केल्यास दुख दूर होते.
८. ९ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात तिची पूजा केल्यास परलोकात सुख मिळते.
९. १० वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात तिची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.