नवरात्री नंतर दसरा का साजरा करतात झेंडूची फुले व शमी (आपट्याची) पाने महत्व व मुहूर्त
Dussehra 2020 Muhurat, Importance, History And Religious Significance In Marathi
दसरा ह्या वर्षी 25 ऑक्टोबर 2020 रविवार ह्या दिवशी आहे. दसरा हा आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष ह्या तिथीवर येतो. दसरा हा दिवस सत्याचा विजय ह्या रूपात मानला जातो.
दसरा पूजा मुहूर्त:
तिथि शुभारंभ: 25 ऑक्टोबर, 7 वाजून 41 मिनट ते
तिथि समाप्ती: 26 ऑक्टोबर, 8 वाजून 59 मिनट पर्यन्त
The Marathi language video of Dussehra 2020 Muhurat, Importance, History And Religious Significance can be seen on our YouTube Channel of: Dussehra 2020 Muhurat, Importance, History And Religious Significance
विजया दशमी म्हणजेच दसरा हा दिवस नवरात्री संपल्यावर साजरा केला जातो. कारण की ह्याच्या संबंध माता दुर्गाशी आहे. धार्मिक करणा नुसार दसऱ्याच्या दिवशी श्री राम यांनी रावणचा वध केला होता. ह्याच बरोबर असे सुद्धा म्हटले जाते की ह्याच काळात रावण चा वध करण्या अगोदर श्री राम ह्यांनी समुद्र किनाऱ्यावर 9 दिवस माता दुर्गाची पूजा अर्चा केली होती. मग दहाव्या दिवशी त्यांना रावणाच्या युद्धा बरोबर विजय प्राप्त झाला होता. असे सुद्धा म्हणतात की माता दुर्गानी नऊ दिवस महिषासुर बरोबर युद्ध करून दहाव्या दिवशी विजय प्राप्त केला होता.
दसरा ही शुभ तिथी आहे हिंदू धर्मा नुसार ह्या दिवशी संपूर्ण दिवस शुभ मानला जातो. तसेच सत्याचा विजय दिवस म्हणून सुद्धा मानले जाते. दसरा शुक्ल पक्षच्या दशमी ह्या तिथीला येतो. म्हणून ह्या दिवसाला विजया दशमी सुद्धा म्हणतात. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्त पैकी एक तिथी म्हणजे दसरा हा दिवस मानला जातो.
आता आपण पाहूया की नवरात्री नंतर दसरा हा दिवस का साजरा करतात.
धार्मिक मान्यता नुसार महिषासुर नावाचा एक राक्षस होता त्याला ब्रह्म देवा कडून आशिर्वाद मिळाला होता की पृथ्वीवर कोणी सुद्धा व्यक्ति त्याला मारू शकणार नाही. ह्या आशीर्वादाच्या मुळे महिषासुरने पृथ्वीवर नुसता हाहाकार चालू केला होता. त्यामुळे ब्रह्मा, विष्णु व शिव हयानी आपल्या शक्तीने तसेच कल्पकतेने माता दुर्गाला महिषासुर शी युद्ध करायला पाठवले. माता दुर्गाने 9 दिवस महिषासुर बरोबर युद्ध केले मग दहाव्या दिवशी महिषासुरचा वध केला. त्यामुळे पृथ्वीवरील लोकाना महिषासुरच्या त्रासा पासून मुक्ती मिळाली व लोकानी आनंद उत्सव मानवण्यास सुरवात केली. कारण ह्यादिवशी माता दुर्गानी महिषासुरवर विजय मिळवला होता म्हणून ह्या दिवसाला विजया दशमी ह्या रूपात साजरा करतात.
दसरा साजरा करण्याचे अजून एक कारण आहे. ह्या दिवशी श्री राम यांनी अत्याचारी रावणाचा वध केला होता. असे म्हणतात की नऊ दिवस श्री राम यांनी देवीच्या नऊ रूपाची नऊ दिवस अगदी विधि पूर्वक पूजा केली होती. व देवीच्या आशीर्वादाने दहाव्या दिवशी रावणाचा वध करून विजय मिळवला होता. कारण रावण हा अधर्म होता म्हणूनच असे म्हणतात की अधर्मवर धर्मची जीत झाली होती. म्हणून हा दिवस साजरा करतात. तसेच भारतात बऱ्याच राजात रावणची प्रतिमा बनवून जाळली जाते.
दसऱ्याच्या दिवशी झेंडू फुलाचे काय महत्व आहे.
दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना विशेष महत्व आहे. दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांच्या माळा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावतात. तसेच वाहनाची पूजा करून वाहनावर पण झेंडूच्या फुलांची माळ लावली जाते त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. म्हणून दसरा, दिवाळी ह्या सणाला आंब्याची पाने व झेंडूच्या फुलांचा हार दरवाजाला लावला जातो व पूजेमद्धे सुद्धा झेंडूची फुले वापरली जातात. तसेच ह्या दिवशी घरातील मुले आपल्या पुस्तकांची पूजा (सरस्वती माताची पूजा) करतात. व महिला आपल्या स्वयंपाक घरातील काही वस्तूच्या पूजा करतात.
दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने किंवा आपट्याची पाने काय महत्व आहे.
श्री राम लक्ष्मण व सीता माता जेव्हा वानवासाला गेले होते तेव्हा एक वर्ष ते अज्ञात वासामद्धे गेले होते. तेव्हा त्यानी आपली शस्त्रे शिमीच्या झाडांमद्धे लपवून ठेवली होते नंतर एक वर्षानी ते आले तेव्हा तो दिवस दसरा हा होता. त्यादिवशी त्यांनी शमीच्या झाडांची पूजा करून आपली शस्त्रे काढून घेतली होती त्यामुळे दसाऱ्याला आपट्याच्या पानाचे महत्व आहे.