दसरा स्पेशल फक्त 2 वस्तु वापरुन 10 मिनिटांत बनवा लाजवाब मिठाई
Dussehra Special Delicious Mithai In 10 Minutes Recipe In Marathi
दसरा आला की आपण आधीपासून गोड पदार्थ काय बनवायचा ह्याचा विचार करत असतो. ह्या दसाऱ्याला अगदी झटपट कमी वेळात म्हणजेच 10 मिनिटात फक्त दोन वस्तु वापरुन अगदी दानेदार मिठाई बनवा.
आपण दसरा 2020 आला की नेहमी पुरणपोळी, श्रीखंड पुरी, किंवा खीर बनवतो. त्याच बरोबर अश्या प्रकारची मिठाई बनवा. आपण ही मिठाई इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. कोणी पाहुणे आले तर आपण झटपट ही मिठाई बनवू शकतो.
The Marathi language video of Dussehra Special Delicious Mithai In 10 Minutes be seen on our YouTube Channel of: Dussehra Special Delicious Mithai In 10 Minutes
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहित्य:
1 कप पनीर
1 कप मिल्क पावडर
½ कप दूध
4 चमचे साखर
1 चमचा तूप
¼ टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट सजावटीसाठी
कृती: मिठाई बनवण्यासाठी घरी पनीर बनवून घ्या. किंवा बाजारातून पनीर आणले तरी चालेल. पनीर किसून घ्या. काजू, बदाम व पिस्ते बारीक चिरून घ्या. स्टीलच्या प्लेटला थोडेसे तूप लाऊन त्यावर बटर पेपर ठेवून त्याला परत थोडेसे तूप लाऊन ठेवा.
नॉनस्टिक पॅनमध्ये किसलेले पनीर घेऊन त्यामध्ये दूध व मिल्क पावडर घालून मिक्स करून घेऊन मध्यम विस्तवावर मिश्रण आटवून घ्या, मिश्रण आटायला लागले की त्यामध्ये साखर व वेलची पावडर घालून मिक्स करून परत मंद विस्तवावर आटवायला ठेवा.
मिश्रण घट्ट झालेकी तूप लावलेल्या प्लेटमध्ये मिश्रण काढून घ्या. बोटांना तूप लावून मिश्रण एक सारखे करून घ्या. बाजूनी ड्रायफ्रूटचे तुकडे घालून मिठाई सेट करायला ठेवा. पाहिजे तर फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवा.
मिठाई सेट झाल्यावर त्याचे पिसेस कट करून घ्या. मग सर्व्ह करा.