सहज सोपा एगलेस पॅनमध्ये मारी बिस्किट केक मुलांसाठी
Easy Eggless Marie Biscuit Cake In Pan For Kids Recipe In Marathi
केक म्हंटले की मुले अगदी आनंदाने खातात. ह्या अगोदर आपण बऱ्याच प्रकारचे झटपट म्हणजेच 2 मिनिटात 5 मिनिटात 10 मिनिटात केक कसे बनवायचे ते पाहिले.
The Marathi language video Easy Eggless Marie Biscuit Cake In Pan For Kids be seen on our YouTube Channel of: Easy Eggless Marie Biscuit Cake In Pan For Kids
आता आपण अगदी निराळा व चविष्ट केक बनवणार आहेत. त्यासाठी मारी बिस्किट वापरली आहेत. मारी बिस्किट केक बनवताना अंडी वापरली नाही तसेच ओव्हन सुद्धा वापरला नाही त्यासाठी नॉनस्टिक पॅन वापरला आहे त्यामुळे केक बनवायची काही झंझट नाही.
मारी बिस्किट केक आपण जेवण झाल्यावर सर्व्ह करू शकतो किंवा दुपारी दुधा बरोबर सर्व्ह करू शकतो किंवा मुलांना शाळेत जाताना छोट्या सुट्टीसाठी सुद्धा टिफिनमध्ये देवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ; 10 मिनिट
बेकिंग वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4-6 जणसाठी
साहित्य:
150 ग्राम मारी बिस्किट किंवा 1 ½ कप मारी बिस्किट पावडर
½ कप पिठीसाखर
¼ कप तेल
1 टी स्पून बेकिंग पावडर
¼ टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून काजू बदाम तुकडे
कृती: साखर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्या. वेलची पावडर बारीक करून घ्या. नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये एक स्टँड ठेवा आपण गरम भांडी ठेवायला वापरतो तो ठेवा. पॅन 15 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या. ज्या केकच्या भांड्यात केक बनवायचा आहे त्या भांड्याला तूप लाऊन घ्या.
मारी बिस्किट एका बाउलमध्ये घेऊन त्याचे तुकडे करून मिक्सरच्या भाड्यात घेऊन ग्राइंड करा. ग्राइंड केलेली पावडर एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये पिठीसाखर व बेकिंग पावडर घालून मिक्स करून घ्या.
मिक्स केलेल्या मिश्रणात तेल घालून परत मिक्स करून घेऊन थोडे थोडे दूध घालून मिक्स करा. मग त्यामध्ये वेलची पावडर व ड्राय फ्रूट घालून मिक्स करा.
पॅन चांगला गरम झाला असेल आता त्यामध्ये केकच्या मिश्रणाचे भांडे ठेवून त्यावर झाकण ठेवा. मग मंद विस्तवावर 40-45 मिनिट केक बेक करून घ्या.
केक बेक झाल्यावर बाहेर काढून थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर मुलांना सर्व्ह करा.