रांगोळीचे महत्व प्राचीन इतिहास व त्यापासून होणारे फायदे इन मराठी
Importance, History And Significance Of Floor Rangoli In Marathi
रांगोळी व त्यामध्ये भरलेले रंग आपले मन अगदी मोहून टाकते. आपल्या हिंदू धर्मात दारासमोर व तुळशी वृंदावन समोर रांगोळी काढण हे शुभ मानले जाते. रांगोळी हा महिलांचा अगदी आवडता विषय आहे. भारतात प्रतेक सणाला दारासमोर रांगोळी काढली जाते.
रांगोळी काढण ही एक कला आहे. जेव्हा आपण रांगोळी काढत असतो तेव्हा आपोआप आपण आनंदानी रांगोळी काढत असतो त्यामुळे आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा येते.
The Marathi language video of Importance, History And Significance Of Floor Rangolican be seen on our YouTube Channel of: Importance, History And Significance Of Floor Rangoli
रांगोळी काढताना आपण अंगठा व बोट च्या सहयानी रांगोळी काढत असतो त्यामुळे बोटाची ज्ञानमुद्रा तयार होते त्यामुळे आपलया मेंदूला ऊर्जा मिळून सकारात्मक ऊर्जा मिळून आपण तनावा तून मुक्त होतो. तसेच हाय ब्लडप्रेशर मधून वाचवून आपल्याला मानशांति मिळते.
रांगोळीचे महत्व
जगामध्ये कोणाला रंग आवडत नाही असे कोणी नसेलच. तसेच विविध रंग पाहून आपले मन प्रफुल्लित होते. आपल्या भारतात रंगोळीला खूप महत्व आहे. भारतात कोणता सुद्धा सण असला की विविध रंग भरून रांगोळी काढतात. रांगोळीमुळे आपल्या प्रतेक सणाचा आनंद द्वीगुणीत होतो
रांगोळी काढल्याच्या विना आपला कोणता सुद्धा सण पूर्ण होत नाही. मग तो दिवाळी, दसरा, पाडवा, होळी, किंवा गणेश चतुर्थी ह्या सणाला रांगोळीतर काढलीच जाते. रांगोळी आपण रंग भरून काढतो किंवा पाना-फुलाची काढतो किंवा धान्याची काढतो.
भारतात अगदी पूर्वी पासून रांगोळी काढण्याचे परंपरा आहे. आपण जमिनीवर किंवा भितीवर सुद्धा रांगोळी काढू शकतो. सणवाराला तर रांगोळी काढण्याची रीत अगदी पूर्वी पासून आहे. रांगोळीचा अर्थ असा आहे की आपल्या मनातील भावना व्यक्त करणे. आपण रांगोळी रंग, फूल, किंवा रंगीत वास्तुनि किंवा दिवे लावून सुद्धा काढू शकतो.
संस्कृत शब्द ‘अल्पना’
अल्पना म्हणजे अलेपना म्हणजेच लेपन करणे. रांगोळी काढताना आपण जमिनीवर किंवा भितीवर रंगाचे लेपण करतो म्हणून त्याला अल्पना म्हणतात हा एक संस्कृत शब्द आहे.
रंग किंवा फूलांची रांगोळी
दिवाळी हा आपला सर्वात मोठा सण आहे. तेव्हा आपण घराची साफ सफाई करतो. पूर्वीच्या काळी साफ सफाई झाल्यावर भिंतीवर फुलांची रांगोळी किंवा देवी देवतांच्या प्रतिमा रंगवायचे तसेच लक्ष्मीची पावल काढायचे. दिवाळीमद्धे रांगोळी काढणे ही नुसतीच परंपरा नाही तर त्यामागे एक सुंदर इतिहास आहे.
पूर्वीच्या लोकांच्या नुसार:
पूर्वीच्या लोकांच्या म्हणण्या नुसार जेव्हा लंकेश रावण चा वध करून श्री राम आपल्या पत्नी सीता माता सोबत अयोध्याला 14 वर्ष वनवास संपवून आले होते तेव्हा अयोध्या वासीयांनी त्याचे स्वागत रांगोळ्या काढून दिवे लाऊन केले होते. तेव्हा पासून दिवाळी ह्या सणाला रांगोळी काढून दिवे लावायची पद्धत आहे.
असा आहे इतिहास
रांगोळीचा इतिहास पाहयचा झाला तर रांगोळी ही मोहन जोदड़ो व हड़प्पाच्या बरोबर जुळलेला आहे. तेव्हा पासून रांगोळीचे अस्तित्व आहे. असे म्हणतात की 5000 वर्षापासून रांगोळी ही काढली जाते.
रांगोळीच्या इतिहास राजा ‘चित्रलक्षण’ च्या कहाणीशी जुळलेला आहे. त्यानुसार राजाच्या दरबारातील पुरोहितचे सुपुत्र ह्याचे अचानक देहावसान झाले त्यामुळे ते खूप दुखी झाले. त्यांचे दुख कमी होण्यासाठी चित्रलक्षण राजानी सृष्टिची रचना करणारे भगवान ब्रह्मा ह्याच्याकडे प्रार्थना केली. राजाची प्रार्थना आइकून भगवान ब्रह्म प्रकट झाले व त्यानी राजाला भिंतीवर देहावसान झालेल्या पुरोहितच्या मुलाचे चित्र काढायला सांगितले. लगेच राजानी चित्र काढायची आज्ञा केली. भिंतीवर चित्र काढल्यावर चित्र पाहिल्यावर लगेच पुरोहितच्या मुलाचा पुनर्जन्म झाला.
सर्वात पहिली रांगोळी
राजा ‘चित्रलक्षण’ च्या दरबारातील ही सर्वात पहिली रांगोळी काढली गेली. खर महणजे रांगोळीच्या संबंधित काही कहाण्या आहेत. पण आजकालच्या आधुनिक काळामध्ये रांगोळीचे महत्व व आपल्या संसारात ह्याचे काय महत्व आहे हा वेगळा बिंदु आहे.
धार्मिक मान्यतानुसार
धार्मिक मान्यता नुसार रांगोळी ही कलात्मक किंवा सजावटीची वस्तु नाही. घराच्या दारासमोरील रांगोळी ही बुरी आत्मा व काही दोष ह्यांना दूर ठेवते. रांगोळीतिल सुंदर रंग आपल्या घरातील खुशहाली व सुख-समृद्धि आणते. भारतात बऱ्याच क्षेत्रात रांगोळी काढताना लोक-गीत म्हंटले जाते.
नकारात्मक ऊर्जाचा विनाश होतो
तसेच एक महत्वाचे म्हणजे घरासमोरील रंग भरलेली रांगोळी घरात येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा रोकते. रांगोळीमध्ये आपण त्रिकोण, चौकोन, आयात असे विविध आकार काढतो त्यामुळे घरात येणारी नकारात्मक शक्ति बाहेरच्या बाहेर निघून जाते. म्हणून पूर्वीच्या काळा पासून घरासमोर रोज सडा व रांगोळी काढली जाते.
सकारात्मक ऊर्जा घरात येते.
घरासमोरील रांगोळी ही घरात सकारात्मक ऊर्जा आणते. म्हणून भारतात रांगोळीचे महत्व आहे. तसेच तिचे महत्व वेगवेगळ्या धार्मिक देवीन बरोबर जोडले आहे.
देवी थिरुमाल व त्यानचा विवाह
घरासमोरील रांगोळीच्या बरोबर देवीची पावल काढली जातात. तसेच भारतातील दक्षिण भागात तामिळनाडू खास रांगोळीचे महत्व आहे. असे म्हणतात की ह्या भागात देवी माता “थिरुमाल” चा विवाह दिवाळीच्या विलेस झाला होता. म्हणून ह्या दिवासात प्रतेक घरा समोर रांगोळी काढली जाते. तसेच घरातील महिला अथवा मुली सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वातावरणात रांगोळी काढून रंग भरतात. असे म्हणतात की असे केल्याने माता “थिरुमाल” ची कृपा त्या घरावर राहते.
माता सीताचा विवाह
माता “थिरुमाल” च्या व्यतिरिक्त माता सीता च्या विवाहची कहाणी रांगोळी बरोबर जोडली जाते. श्री राम व सीता माता ह्यांच्या विवाहच्या वेळी सर्व ठिकाणी रांगोळ्या काढून सजवले होते.