अश्या प्रकारची लाल भोपळ्याची करी खाऊन तरी पहा नेहमी बनवायल
Indian Style Tasty Red Pumpkin Curry Recipe In Marathi
लाल भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.त्याची भाजी पण छान लागते. पण त्याची भाजी गोड होत असल्याने ती काही जणांना आवडत नाही. लाल भोपल्याच्या भाजीचा अजून एक प्रकार आहे टे म्हणजे लाल भोपळ्याची ग्रेव्ही. ग्रेव्ही ही टेस्टी लागते. तसेच हा अगदी निराळा प्रकार आहे त्यामुळे सगळे अगदी आवडीने खातात. आपण अश्या प्रकारची ग्रेव्ही चपाती किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video of Indian Style Tasty Red Pumpkin Curry can be seen on our YouTube Channel of: Indian Style Tasty Red Pumpkin Curry
प्रथम आपण लाल भोपळ्याची भजी बनवून ती ग्रेव्ही मध्ये सोडायचे. अगदी निराळा प्रकार आहे पण टेस्टि आहे मुले सुद्धा अगदी आवडीने खातील.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनिट
वाढणी: 4 जणासाठी
ग्रेव्ही मसाला साहित्य:
1 टे स्पून तेल
2 मोठे कांदे (मध्यम आकाराचे चिरून)
7-8 लसूण
1 हिरवी मिरची (चिरून)
1” आले (तुकडा चिरून)
2 टे स्पून सुके खोबरे (किसून)
5-6 काजू
1 मोठा टोमॅटो (चिरून)
ग्रेव्ही करिता:
1 टे स्पून तेल
वाटलेला मसाला
मीठ चवीने
½ टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
½ टी स्पून गरम मसाला
1 टे स्पून फ्रेश क्रीम
लाल भोपळा भजी करिता साहित्य:
250 ग्राम लाल भोपळा (किसून)
½ वाटी बेसन
मीठ चवीने
1 टी स्पून ओवा
2 मिरच्या, 4 लसूण (कुटून)
¼ टी स्पून हळद
½ टी स्पून लाल मिरची पावडर
½ टी स्पून गरम मसाला
थोडे ड्रायफ्रूट (काजू बदाम)
तेल भजी तळण्यासाठी
सजावटीसाठी:
फ्रेश क्रीम व कोथबिर
कृती: ग्रेव्ही मसाला: कांदा चिरून घ्या, लसूण सोलून घ्या. एका कढईमद्धे 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये लसूण व हिरवी मिरची घालून मिक्स करून काजू तुकडे, सुके खोबरे घालून थोडे परतून घेऊन चिरलेला टोमॅटो घालून परत दोन मिनिट परतून घ्या. विस्तव बंद करून मसाला थंड करायला ठेवा. मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
लाल भोपळा धुवून सोलून किसून घ्या. मग एक बाउलमध्ये किसलेला भोपळा घेऊन त्यामध्ये बेसन, मीठ, ओवा, हिरवी मिरची व लसूण कुटून, हळद, गरम मसाला, घालून मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्यामध्ये ड्राय फ्रूट घालून गोळा बंद करा.
कढईमद्धे तेल गरम करून त्यामध्ये गोळे गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या.
एका पण मध्ये 1 टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला घालून तेल सुटे पर्यन्त भाजून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून 1 कप पाणी घालून मसाला मंद विस्तवावर 5 मिनिट शीजवून घ्या. मग त्यामध्ये फ्रेश क्रीम घालून मिक्स करून एक उकळी आली की विस्तव बंद करा.
सर्व्ह करताना एक प्लेटमध्ये कोफ्ते किंवा भजी ठेवून त्यामध्ये ग्रेव्ही घालून वरतून कोथबिर व फ्रेश क्रीम घालून सजवून चपाती बरोबर सर्व्ह करा.