कोजागिरी पूर्णिमा शरद पूर्णिमा 2020 मुहूर्त महत्व कथा पूजाविधी मसाला दूध
Kojagiri Purnima 2020 Muhurat Importance Katha Puja Vidhi Masala Milk In Marathi
शरद पूर्णिमा ह्या वर्षी 30 ऑक्टोबर शुक्रवार ह्या दिवशी आहे. हिंदू पंचांग नुसार आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्ष ह्या दिवशी शरद पूर्णिमा येते. हिंदू धर्मात दर महिन्याच्या अमावस्या व पूर्णिमा ह्या दिवसाला विशेष महत्व आहे. पण शरद पूर्णिमा अगदी खास मानली जाते. ह्या दिवशी चंद्र प्रकाशानी सारी पृथ्वी झगमगून जाते. असे म्हणतात की चंद्राच्या किरणांनी अमृत वर्षाव होत आहे. प्रतेक ठिकाणी शरद पूर्णिमाला वेगवगळ्या नावांनी संभोदले जाते. काही ठिकाणी कोजागिरी पूर्णिमा, रास पूर्णिमा, किंवा कोमुदी व्रत सुद्धा म्हणतात. शरद पूर्णिमा ह्या दिवासापासून शरद ऋतुचे आगमन होते.
The Marathi language video Kojagiri Purnima 2020 Muhurat Importance Katha Puja Vidhi Masala be seen on our YouTube Channel of: Kojagiri Purnima 2020 Muhurat Importance Katha Puja Vidhi Masala
कोजागिरी पूर्णिमा शरद पूर्णिमा 2020 मुहूर्त:
पूर्णिमा तिथि आरंभ- 30 ऑक्टोबर संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिट पासून ते
पूर्णिमा तिथि समाप्ति- 31 ऑक्टोबर रात्री 8 वाजून 21 मिनट
कोजागिरी पूर्णिमा किंवा शरद पूर्णिमाचे महत्व
पूर्ण वर्षात जितक्या पूर्णिमा येतात त्यामधील शरद पूर्णिमाची सर्वजण वाट पाहत असतात. शरद पूर्णिमा ह्या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी पृथ्वीवर अमृत वर्षाव करत राहतो. शरद पूर्णिमा ह्या दिवशी खीर बनवून रात्रभर चंद्र प्रकाशात ठेवून दुसऱ्या दिवशी घरातील सर्व व्यक्तिनि ही खीर प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास बऱ्याच आजारा पासून मुक्ती मिळते असे म्हणतात. ज्योतिष शास्त्रा नुसार ज्याच्या कुंडलीतील चंद्र हा ग्रह शुभ फळे देत नाही त्यांनी ही खीर प्रसाद म्हणून जरूर ग्रहण करावी. तसेच शरद पूर्णिमा ह्या दिवशी लक्षी देवीचे आगमन होते म्हणून ह्या दिवशी लक्ष्मी माताना प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजा अर्चा केली जाते.
शरद पूर्णिमाची कहाणी:
एक सावकार होता त्याला दोन मुली होत्या. दोघी जणी शरद पूर्णिमाचे व्रत करत होत्या. मोठी मुलगी पूर्ण व्रत करायची व धाकटी नेहमी अर्धवट व्रत करायची त्यामुळे धाकट्या मुलीचे मूल नेहमी जन्मले की मारायचे. तिने ब्रह्मणाला ह्याचे कारण विचारले तेव्हा ब्रह्मणाने उत्तर दिलेकी तू नेहमी पूर्णिमा व्रत अर्धवट करत होतीस. त्यामुळे तुझे मूल जगत नाही. तू जर पूर्णिमा व्रत अगदी विधी पूर्वक केले तर तुझी संतती जगू शकेल.
त्यानुसार धाकट्या मुलीने शरद पूर्णिमा ह्याचे व्रत विधी पूर्वक पूर्ण केले. मग तिला मुलगी झाली पण तिची मुलगी लगेच मरण पावली. मग तिने मुलीच्या अंगावर कापड घातले व मोठ्या बहिणीला बोलवायला गेली. मोठी बहीण आल्यावर तिने बहिणीला जेथे मुलीला ठेवले होते त्या जागेवर बसायला सांगितले. जेव्हा मोठी बहीण बसणार तेव्हडयात तिचा घागरा त्या मुलीच्या अंगाला लागला व ती मरण पावलेली मुलगी लगेच रडायला लागली.
मोठी बहीण म्हणाली की तू मला पाप करायला सांगत होतीस. मी जर मुलीच्या अंगावर बसले असते तर मी बसल्यावर ती मरून गेली असती. तेव्हा धाकटी बहीण म्हणाली अग तुझ्या घागरा त्या मुलीच्या अंगाला लागला म्हणून ती जीवंत झाली. त्यानंतर धाकटी बहीण नेहमी नियमित शरद पूर्णिमाचे व्रत पूर्ण करायला लागली.
शरद पूर्णिमा पूजाविधी:
शरद पूर्णिमा ह्या दिवशी ब्रम्ह मुहूर्तवर उठून स्वच्छ आंघोळ करावी.
एका चौरंगवार लाल रंगाचे कापड घालून त्यावर माता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी. लक्ष्मी देवीला लाल फुले, नेवेद्य, अत्तर, वस्त्र, गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप नेवेद्य, तांबूल, सुपारी व दक्षिणा अर्पित करावी.
पूजा केल्यावर लक्ष्मी देवीचा मंत्र म्हणून लक्ष्मी चालीसा वाचावी. मग आरती म्हणावी.
नंतर खिरीचा नेवेद्य दाखवावा. खिरीचे भांडे रात्री चंद्र प्रकाशात ठेवावे. मग दुसऱ्या दिवशी घरातील सर्व जणांनी खीर सेवन करावी.
पूर्ण दिवस उपवास करून कथा आईकावी. भगवान शिव, पार्वती व कार्तिकेयची पूजा करावी.
कोजागिरी पूर्णिमा ह्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजा जवळ दिवा लावतात व घराच्या मुख्य दरवाजा पासून देव घरापर्यंत लक्ष्मीची पावल काढतात.
कोजागिरी पूर्णिमा करिता मसाला दूध:
मसाला मिल्क हे महाराष्टात कोजागिरी पौर्णिमेला अगदी आवर्जून करतात. हे मसला दुध पौस्टिक तर आहेच व टेस्टला पण खूप छान लागते. कोजागिरी पौर्णिमेला देवीची पूजा करून घरात देवीची पावले काढून आनंदी वातावरण ठेवले जाते. शरद पौर्णिमा ह्या दिवशी रात्री जागरण करून चांदण्या रात्री मसाला दुध आटवून सगळ्यांना दिले जाते. नाच, गायन ह्याचा प्रोग्राम केला जातो, चटपटीत भेळ व मसाला दुध बनवले जाते. मसला दुधामध्ये काजू, बदाम, पिस्ते, जायफळ पूड, वेलचीपूड व केसर वापरले आहे.
साहित्य :
१ लिटर दुध (म्हशीचे)
१ १/२ कप साखर (गोडी आपल्या आवडीनुसार)
८-१० काजू
८-१० बदाम
७-८ पिस्ते
१/४ टी स्पून जायफळ पूड
१ टी स्पून वेलचीपूड
८-१० केसर काड्या
चरोळी (आवडत असल्यास)
कृती : काजू, बदाम, पिस्ताची पूड करून घ्या. जायफळ किसून घ्या. वेलचीपूड करून घ्या.
दुध गरम करून १० मिनिट मंद विस्तवावर आटवून घ्या. त्यामध्ये साखर मिक्स करूनपरत ५-७ मिनिट आटवून घ्या.
मग त्यामध्ये काजू, बदाम, पिस्ते ची पूड, जायफळ पूड, वेलचीपूड, केसर घालून मिक्स करून घ्या.
सर्व्ह करतांना गरम-गरम सर्व्ह करा.