नवरात्री देवीची नऊ रूप, नऊ रंग त्याचे प्रतीक व देवीची ओटी कशी भरावी
Navratri 2020 list of 9 colours And their Significance In Marathi
नवरात्रीमध्ये जसे देवीमाताची 9 रूप असतात तसेच नऊ दिवसाचे नऊ रंग असतात. प्रतेक दिवसाच्या रंगाचा एक विशिष्ट हेतू आहे. व तो रंग त्या दिवसाचे शुभ प्रतीक मानले जाते. प्रतेक दिवशी देवीला त्या रंगाची साडी नेसवतात
The Marathi language video of Navratri 2020 list of 9 colours And their Significance can be seen on our YouTube Channel of : Navratri 2020 list of 9 colours And their Significance
महाराष्ट्रात व गुजरातमध्ये प्रतेक दिवसाचे रंग अगदी शुभ मानले जातात व महिला त्या दिवशी त्या रंगाची साडी किंवा ड्रेस घालतात. तसेच ऑफिस, बँक, ह्या ठिकाणी महिला त्या दिवसा जो रंग असेल त्या रंगाची साडी नेसून ऑफिस मध्ये जातात, त्यामुळे एक प्रकारचे मंगलमय व उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
नऊ दिवसाची माताची 9 रूप व रंग कोणते ते आपण पाहूया.
आता आपण पाहूया प्रतेक दिवसाच्या रंगाचे महत्व काय आहे.
1 करडा :
करड्या रंगाचे कपडे घालून पूजा केल्यास व्यावहारिक जीवनात सरळ बनून निशचित विचारधारा ठेवणारे हे ह्या रंगाचे प्रतीक आहे.
2 नारंगी :
नारंगी कपडे घालून पूजा केल्यास स्फूर्ति व उल्हास मिळतो तसेच सकारात्मक ऊर्जा मिळून चित्त स्थिर ठेवते.
3.पांढरा :
पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा केल्यास शुद्धता व सरळ मार्गाचा पर्याय मिळतात. पांढरा रंग आत्मशान्ती व सुरक्षाचा अनुभव देतो.
4. लाल :
लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास उत्साह व प्रेमाचे प्रतीक मिळते व लोकप्रियतेची शक्ति मिळते साहस व शक्ति प्राप्त होते.
5. डार्क निळा:
डार्क निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास अतुलनीय आनंद अनुभवायला मिळतो. समृद्धी व शांतीचे प्रतीक मानले जाते.
6. पिवळा:
पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास मनुष्याचे चित्त नीट राहते व अशांती दूर होऊन मन प्रसन्न व प्रफुलीत राहते.
7. हिरवा:
हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास शांती व स्थिरताची भावना उत्पन्न होते. जीवनात काहीतरी नवीन गोष्ट करण्याचे प्रतीक आहे.
8. मोरपंखी हिरवा:
मोरपंखी हिरवा रंगाचे म्हणजेच निळा व हिरवा रंग मिश्रण केल्यावर जो रंग होतो त्या वस्त्राचे परिधान करून पूजा केल्यास समृद्धी व नवीनताचा लाभ होतो.
9. जांभळा:
जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास राजेशाही थाट बाटचे प्रतीक आहे.
देवीचे विविध रंग वापरल्यास पूजा करून झाल्यावर समृद्धी व संपन्नता प्राप्त होते.
देवीची ओटी कशी भरावी:
देवीला नेहमी सूती किंवा रेशमी साडी नेसवावी.
साडीवर खण व नारळ ठेवावा. नारळाची शेंडी देवीच्या बाजूला असावी. ओटी आपल्या ओंजळीत ठेवून आपली ओंजळ छातीच्या समोर येईल अशी धरून देवी समोर उभे राहावे.
आपली उन्नती व्हावी म्हणून देवी समोर हात जोडून प्रार्थना करावी.
साडी, खण, नारळ देवीच्या चरणावर ठेवून तांदळाने तिची ओटी भरावी.
नंतर देवीचा प्रसाद म्हणून साडी नेसावी व नारळाचा गोड पदार्थ बनवून खावा.