घरातील ही एक वस्तू वापरा धान्या तील किडे मिनिटात पळून जातील
Tips For Storing Food Grains at Home In Marathi
भारतात घरोघरी वर्ष भराचे धान्य साठवून ठेवायची पद्धत आहे. धान्यमध्ये गहू तांदूळ, डाळी साठवून ठेवतात. पण जेव्हा आपण वर्ष भराचे धान्य साठून ठेवतो तेव्हा ते योग्य रीतीने ठेवले तर त्यामध्ये किडे मकोडे होत नाहीत. वर्ष भराचे धान्य साठून ठेवणे हे सुद्धा सोपे नाही. कारण किडे झालेतर नुकसान सुद्धा होते.
पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपल्या धान्यात हमखास किडे होतात ते होऊ नये म्हणून सोपे उपाय आहेत.
The Marathi language video Tips For Storing Food Grains at Home can be seen on our YouTube Channel of : Gharatil Hi Ek Vastu Takun Dhaanya Varshbhar Tikwa
आपण आता पाहूया आपले साठवणीचे धान्य कसे साठवायचे
गहू, तांदूळ व डाळी कसे साठवून ठेवावे.
• आपल्याला ज्या डब्यात धन्य साठून ठेवायचे आहेत तो डब्बा स्वच्छ धुवून कोरडा करून घ्या.
• धान्यामद्धे आपण 2-3 तमालपत्र ठेवू शकता त्याच्या वासामुळे किडे होत नाहीत.
• आपण गहू व डाळीला सारसुचे तेल लावू शकता. त्याकरिता हातावर थोडेसे सारसुचे तेल घेऊन सर्व धान्याला चोळून मग ऊन देवून डब्यात भरून ठेवावे.
• कडू लिंबाच्या पानात औषधी गुणधर्म आहेत. आपण कडू लिंबाच्या पानाची जुडी 2-3 दिवस घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावी मग 2-3 दिवस झालेकी जुडी काढावी पाने सुकलेली असतील ती पाने काढून एक छोट्या प्लॅस्टिक पिशवीत भरून बंद करावी मग प्लॅस्टिक पिशवीला मधून मधून छोटी भोके करून त्या पिशव्या धान्यामद्धे ठेवाव्या. किडे आजिबात होणार नाहीत.
• अजून एक सोपा उपाय बिना खर्चाचा आपल्या घरी न्यूज पेपर असतो त्याचे छोटे छोटे तुकडे करून धान्यामद्धे टाकावे त्याच्या वासानी किडे होत नाहीत.
• आपण साठवणीच्या धान्यामद्धे सुक्या लाल मिरच्या पान टाकू शकता त्याच्या वासानी किडे होत नाहीत.
• जर आपल्या घरी हळकुंड असतील तर ती सुद्धा टाकू शकता. तसेच खडे मीठ घातले तरी चालते. किंवा अजून एक सोपा उपाय म्हणजे लसूण कांड घालू शकता.
• रवा मध्ये 10 लवंग घाला किंवा रवा भाजून थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवला तरी चालतो. मध (honey) मध्ये 7-8 मिरे घालू शकता.
• चणे, छोले किंवा कडधान्य ऊन देवून मग डब्यात भरले तरी चालते. पण उन्हात तांदूळ नाही ठेवायचे ते खराब होऊ शकतात.
• बाजारात आपल्याला कीटक नाशक औषधे मिळतात म्हणजेच पाऱ्याच्या गोळ्या. आपण त्या गोळ्यासुद्धा घालून शकता पण गहू दळून आणताना पाऱ्याच्या गोळ्या अगदी लक्षात ठेवून काढा मग गहू धुवून उन्हात वाळवून मग पिसून आणा. त्यामुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही. नाहीतर आपल्याला आजाराला तोंड द्यावे लागेल.
• तांदळाला आपण बोरीक पावडर सुद्धा लावू शकतो. त्याने सुद्धा किडे किंवा आल्या होत नाहीत.
• कोणत्यापण प्रकारची पीठ असतील तर त्यामध्ये किडे किंवा आल्या होतात त्या होऊ नये म्हणून त्यामध्ये सुकलेल्या 2-3 लाल मिरच्या टाका. तसेच आपण थोडेसे खडे मीठ एक छोट्याश्या मलमलच्या कापडात पुरचुडी बांधून ठेवू शकता.
हे सोपे घरगुती उपाय करून बघा. त्यानी किडे मकोडे होणार नाहीत.