झटपट सोपा बिना ओव्हन बिना अंडे कस्टर्ड केक रेसीपी
Zatpat Easy Eggless Custard Cake in Pressure Cooker Recipe In Marathi
केक हा सर्वाना आवडतो लहान असो अथवा मोठे. कस्टर्ड केक हा चवीला मस्त लागतो. तसेच कस्टर्ड पाऊडर ने त्याचा रंग सुद्धा छान येतो. कस्टर्ड केक बनवताना मैदा व कस्टर्ड पावडर वापरली आहे. तसेच केक बनवताना अंडी वापरली नाही व ओव्हन सुद्धा वापरलेला नाही. जरी ओव्हन नसेल तरी आपण अश्या प्रकारचा केक कुकरमध्ये बनऊ शकतो.
The Marathi language video of Zatpat Easy Eggless Custard Cake in Pressure Cooker be seen on our YouTube Channel of: Zatpat Easy Eggless Custard Cake in Pressure Cooker
बनवण्यासाठी वेळ: 15-20 मिनिट
कुकरमध्ये बेकिंग वेळ: 40 मिनिट
वाढणी: 6 जणासाठी
साहित्य:
1 कप मैदा
¼ कप कस्टर्ड पावडर
½ कप पिठीसाखर
½ कप बटर
¼ टी स्पून व्हनीला एसेन्स
1 ½ टी स्पून बेकिंग पावडर
½ कप दूध
कृती: कुकर गरम करायला ठेवा. त्यामध्ये एक कप मीठ घालून एक स्टँड ठेवा. कुकुर 10-12 मिनिट कमी विस्तवावर गरम करायला ठेवा. केकच्या भांडीला बटर व थोडे आतून मैदा लावून घ्या.
मैदा, कस्टर्ड पाऊडर व बेकिंग पावडर चाळून घ्या. एका बाउलमध्ये बटर व पिठीसाखर मिक्स करून चांगली फेटून घ्या. पिठीसाखर पूर्ण विरघळून मिश्रण चांगले एक जीव झाले पाहिजे.
मग त्यामध्ये चाळलेला मैदा घालून मिक्स करून हळू हळू दूध घालून मिक्स करून मग त्यामध्ये वनीला एसेन्स घालून मिक्स करून घ्या. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात ओतून घ्या.
कुकर चांगला गरम झाला की लगेच त्यामध्ये केकचे भांडे ठेवा. झाकणाची शिट्टी व रिंग काढून ठेवा. मग झाकण लाऊन प्रथम 3-4 मिनिट मोठा विस्तव ठेवा मग थोडा कमी करून 35-40 मिनिट केक बेक करायला ठेवा. 35 मिनिट झालेकी एकदा केक सुरीने किंवा सुईने बेक झाला की नाही ते तपासून बघा. जर सुईला मिश्रण चिकटले नाही तर केक झाला असे समजा. नाहीतर अजून 5 मिनिट बेक करा. मग झाकण काढून केक थंड करायला ठेवा.
कस्टर्ड केक थंड झाल्यावर सर्व्ह करा.
Please put your recipes in English. Marathi not of interest to us as we do not read the language.
Thanks.