झटपट सोपी फक्त दोन चमचे तुपात गव्हाच्या पिठाची बर्फी बिना दूध व खवा
Zatpat Easy Wheat Flour Burfi No Milk No Khoya Recipe In Marathi
गव्हाच्या पिठाची बर्फी खूप टेस्टी लागते तसेच बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. आपण फक्त दोन चमचे तुपात अश्या प्रकारची बर्फी बनवू शकतो त्यासाठी अगदी खूप भाजायची गरज नाही तसेच दूध किंवा खवा सुद्धा वापरायची गरज नाही. अगदी स्वस्त व मस्त अशी बर्फी आहे.
The Marathi language video of Zatpat Easy Wheat Flour Burfi No Milk No Khoya can be seen on our YouTube Channel of: Zatpat Easy Wheat Flour Burfi No Milk No Khoya
गव्हाच्या पिठाची बर्फी दिसायला आकर्षक दिसते व ती पौस्टिक सुद्धा आहे. आपण जेवणा नंतर स्वीट डिश म्हणून सर्व्ह करू शकतो किंवा आपण दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 10 वड्या बनतात
साहीत्य:
¾ वाटी गव्हाचे पीठ
2 टे स्पून तूप
¼ वाटी मिल्क पावडर
¼ वाटी साखर
¼ टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून काजू, बदाम, पिस्ते (तुकडे बारीक करून)
कृती: एक नॉनस्टिक पॅन गरम करून त्यामध्ये 1 टे स्पून तूप घालून तूप विरघळलेकी त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मिक्स करून मंद विस्तवावर पीठ भाजून घ्या. छान खमंग सुंगध आला पाहिजे मग त्यामध्ये अजून एक चमचा तूप घालून मिक्स करून घ्या.
गव्हाचे पीठ भाजून झाल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर घालून थोडी गरम करून घ्या. मग विस्तव बंद करून भाजलेले पीठ एका प्लेटमध्ये काढून घ्या.
नॉनस्टिक पॅन मध्ये 1/4 वाटी साखर + 1 टीस्पून साखर व ½ वाटी पाणी घालून मंद विस्तवावर पाक करायला ठेवा. पाक थोडा चिकट करायचा. मग त्यामध्ये वेलची पावडर घालून भाजलेले पीठ घालून मिक्स करून घ्या. मिश्रण थोडे घट्ट झाले पाहिजे. थोडे तूप सुटायला लागलेकी विस्तव बंद करा.
एक स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यामध्ये मिश्रण काढून एक सारखे करून घ्या. वरतून ड्रायफ्रूटने सजवून अर्धातास बाजूला ठेवा. थंड झाल्यावर वड्या कापून सर्व्ह करा.