14 नव्हेंबर 2020 लक्ष्मी पूजन अगदी सोपी पूजाविधी पद्धत व मुहूर्त
14 November 2020 Lakshmi Pujan Muhurat And Puja Vidhi In Marathi
धनत्रयोदशी ह्या दिवसापासून दिवाळीचे दीवे लावायला सुरवात करतात. धनत्रयोदशी झालीकी नरक चतुर्दशी ह्या दिवशी यमराज ह्याच्या साठी दिवा लावण्याची परंपरा आहे. नंतर कार्तिक अमावस्या तिथी येते त्या दिवशी दिवाळी साजरी करतात. नेहमी अमावस्या च्या दिवशी लक्ष्मी पूजन करतात पण ह्या वर्षी 14 नव्हेबर व 15 नव्हेबर ह्या दोन दिवशी अमावस्या आहे.
The Marathi language video 14 November 2020 Lakshmi Pujan Muhurat And Puja Vidhi be seen on our YouTube Channel of: 14 November 2020 Lakshmi Pujan Muhurat And Puja Vidhi
लक्ष्मी पूजन म्हणजेच मोठी दिवाळी ह्या वर्षी 14 नव्हेबर 2020 शनिवार ह्या दिवशी आहे. ह्या दिवशी लक्ष्मी देवी व गणेशजी ह्याची विधी पूर्वक पूजा केली जाते. व आपण त्यांच्या कडे सुख शांती व धन समृद्धीची याचना करतो. ह्या दिवशी आपले घर, ऑफिस, दुकान, ह्या ठिकाणी लक्ष्मी पूजन करून दिवे लाऊन सजवले जाते. तसेच ह्या दिवशी आपला परंपारिक वेश परिधान करून पूजा केली जाते.
लक्षी पूजन मुहूर्त:
14 नव्हेंबर 2020 शनिवार संध्याकाळी 5:28 मिनिट ते संध्याकाळी 7: 24 मिनिट पर्यन्त (1 तास 56 मिनिट)
प्रदोष काळ: संध्याकाळी 5:27 मिनिट पासून ते 8:07 मिनिट पर्यन्त
अमावस्या काळ: 14 नव्हेंबर दुपारी 2:17 मिनिट पासून ते 15 नव्हेंबर सकाळी 10:36 मिनिट पर्यन्त
लक्ष्मी पूजन विधी:
लक्ष्मी पूजनची मांडणी करण्या अगोदर एक पणती लावावी व ती पणती सर्व घरात फिरवावी म्हणजे घरात कुठे अलक्ष्मी असेल तर ती निघून जाईन असे म्हणतात. घरात सर्व मंगलमय वातावरण ठेवावे. घरच्या मुख्य दारा समोर सडा घालून रांगोळी काढावी. दिवे लावावे.
1. लक्ष्मी पूजन करण्यासाठी अगोदर थोडी तयारी करून घ्यावी. त्यासाठी सर्व प्रथम आपण ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी किंवा आपल्या घरातील पूजा घर जेथे आहे तेथे पूजा करावी. ज्या जागी पूजा करणार आहोत त्या जागी गंगाजल शिंपडून तेथे पाट किंवा चौरंग ठेवावा त्यावर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र घालावे. त्यावर तांदूळ घेऊन रांगोळी किंवा स्वस्तिक काढावे. तांदळाची रांगोळी काढल्यावर त्यावर लक्ष्मी माताची मूर्ती किंवा तसवीर सन्मान पूर्वक ठेवावी. मग उजव्या व डाव्या बाजूला एक मूठ गहू किंवा तांदूळ ठेवावे.
2. त्यानंतर कलश तयार करायचा त्यासाठी कलशमध्ये पाणी, सुपारी, झेंडूचे फूल, कॉईन, व थोडेसे तांदूळ घालावे. मग 5 आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा. नारळाची शेंडी वरच्या बाजूस ठेवावी. चौरंगाच्या बाजूनी फुले ठेवून सजावट करावी.
3. कलश तयार केल्यावर पूजाची थाळी तयार करावी. थाळीमध्ये तांदूळ ठेवा. मग थाळीमध्ये हळदिनी कमळ काढून घ्या. नंतर आपल्याला त्यावर लक्ष्मी माताची मूर्ती अभिषेक करण्यासाठी ठेवायची आहे. (आपण प्रथम पाटावर जी मूर्ती ठेवली आहे ती मूर्ती). मूर्तीच्या समोर काही कॉईन्स ठेवाव्या.
4. हिंदू धर्मा नुसार पूजा किंवा हवन करण्याच्या अगोदर प्रथम गणेशजीची पूजा केली जाते. कलश च्या शेजारी उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती ठेवावी. मूर्ती ठेवताना दक्षिण-पश्चिम ह्या दिशेला ठेवावी. मग हळद-कुंकू वाहून अक्षता वहाव्या.
5.त्यानंतर आपला काही उद्योग धंदा असेल त्याची वह्या पुस्तक देवाच्या समोर ठेवून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. मग त्याच्या समोर दिवा लावावा.
6. साजूक तुपाच्या दिवा लाऊन पूजेच्या थाळीत ठेवावा. त्यावर हळद-कुंकू, अक्षता व फूल वाहावे. मग कलश वर हळद-कुंकू लावून अक्षता ठेवून फूल वहावे.
7. आता लक्ष्मी माताला आव्हान करावे. त्यासाठी मंत्र जाप करावा. डोळे बंद करून प्रार्थना करावी मग फूल व अक्षता अर्पण कराव्या.
8. आता देवी माताला हळदीने कमळ काढलेल्या ताम्हण किवा प्लेटमध्ये ठेवा व पंच अमृतनि स्नान घालावे मग शुद्ध पाणी सोडावे. मग पुसून ठेवावे. हळद कुंकू , अक्षता फूल वहावे. मग दिवा अगरबती लावावी.
9. पूजा झाल्यावर मिठाई चा नेवेद्य ठेवावा. समोर नारळ, पान सुपारी ठेवा. मग फळ, पैसे, धन ठेवावे.
10. पूजा झाल्यावर घरातील सर्व जनानी मिळून आरती म्हणावी. मग सुख समृद्धी, धन दौलत मिळावी म्हणूनप्रार्थना करावी. गणपतीजी ची आरती म्हणून प्रार्थना करावी.
It really awesome article. Thanks for sharing.
Beautiful article on god and goddess.