दिवाळीमध्ये धनप्राप्तीचे प्राचीन 5 सहज सोपे प्राचीन टोटके
5 Simple Diwali Traditional Totke For Money And Prosperity In Marathi
दिवाळी मध्ये धन प्राप्ती साठी काही प्राचीन टोटके आहेत ते जरूर करा. त्यमुळे तुमच्या आयुषात सुख समृद्धी येऊन धन प्राप्ती होऊ शकते. हे प्राचीन टोटके खूप प्रभावी आहेत. तसेच हे टोटके अगदी सोपे व सहज करण्यासारखे आहेत.
The Marathi language video 5 Simple Diwali Traditional Totke For Money And Prosperity be seen on our YouTube Channel of: 5 Simple Diwali Traditional Totke For Money And Prosperity
1. दिवाळीमध्ये हा उपाय करून बघा: धन प्राप्तीसाठी बरेच टोटके आहेत पण दिवाळीच्या दिवशी असे प्राचीन टोटके करणे खूप महत्वपूर्ण आहेत. हा उपाय केल्याने लक्ष्मीमाता प्रसन्न होते त्यासाठी कमल गट्टे च्या माळ 108 वेळा मंत्र जप करण्यासाठी वापरायची आहे. (कमल गट्टेची माळ म्हणजे कमळाच्या बी पासून बनवतात ती लक्ष्मीमाता ला अतिप्रिय आहे.
मंत्र: ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्म्यै नमः।
2. दिवाळी अमावस्या ह्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. त्यामुळे शनि ग्रह संबंधित दोष सगळे निघून जातात. त्याच बरोबर कालसर्प योग नष्ट होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा सकाळी पाणी घालल्यावर रात्री पिंपळाच्या झाडा जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला विसरू नका. दिवा लावून झाल्यावर चुपचाप आपल्या घरी निघून या मागे वळून सुद्धा पाहू नका.
3. दिवाळी च्या दिवशी लक्ष्मी पूजन झाल्यावर सर्व घरात शंख व घंटी वाजून या त्यामुळे घरातील दारिद्रता दूर होईल. व लक्ष्मी माताचे घरात आगमन होते. लक्ष्मी पूजनाच्या वेळी गणपती बाप्पाला 21 दूर्वाची जुडी जरूर वहावी त्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते.
4. दिवाळीच्या पूजेच्या वेळी नवीन झाडू घरात आणून त्याची पूजा करून त्या झाडूने सर्व घरात सफाई करून झाडू लपवून ठेवा त्यामुळे लक्ष्मी माताची कृपा सदैव राहते.
5. लक्ष्मी पूजनाच्या वेळी पूजेच्या ताटात हळकुंड ठेवायला विसरू नका. पूजा झाल्यावर ते हळकुंड आपण आपले पैसे, धन जेथे ठेवतो तेथे ठेवावे. त्यामुळे धन वृद्धी होते.