स्वादिष्ट कंदी पेढा विना खवा अथवा विना पाक सोप्या पद्धतीने बनवा
Delicious Satari Kandi Pedha Without Khoya Recipe In Marathi
कंदी पेढे बनवताना खवा वापरलेला नाही किंवा साखरेचा पाक सुद्धा बनवलेला नाही. तरी खूप छान अश्या प्रकारचे पेढे आपण घरी अगदी झटपट विना मेहनत बनवू शकतो. कंदी पेढे चवीस्ट लागतात. तसेच आपण घरी अश्या प्रकारचे पेढे अगदी स्वस्त व मस्त बनवू शकतो.
The Marathi language video Delicious Satara Or Dharwad Kandi Pedha be seen on our YouTube Channel of Delicious Kandi Pedha
पेढे आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. कंदी पेढे बनवताना साखरेचा तगार म्हणजेच बुरा शक्कर वापरली आहे त्यामुळे त्याची चव अजून छान खमंग होते. कंदी पेढे हे सातारा व धारवाड येथील जग प्रसिद्ध आहेत.
कंदी पेढे ही सातारा किंवा धारवाड ह्या भागात लोकप्रिय आहेत पण आता ते सर्वत्र उपलब्ध होतात.
बनवण्यासाठी वेळ: 25 मिनिट
वाढणी: 18 पेढे बनतात
साहीत्य:
2 कप मिल्क पावडर
4 टे स्पून साजूक तूप
½ कप दूध (1/2 कापला थोडेसे कमी घ्या म्हणजे साधारणपणे 2 टे स्पून)
¼ टी स्पून वेलची पावडर व जायफळ
½ कप बुरा शक्कर
कृती: नॉनस्टिक पॅन गरम करून त्यामध्ये 2 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये मिल्क पावडर घालून मिक्स करून मंद विस्तवावर थोडा ब्राऊन रंग येई पर्यन्त गरम करून घ्या. पण मिल्क पावडर सारखी हलवत रहा. नाहीतर पेढ्याला करपट वास येवू शकतो. मधून मधून 1 -1 टे स्पून तूप घालून मिक्स करून घ्या.
मिल्क पावडरला ब्राऊन रंग आल्यावर त्यामध्ये ½ कप दूध घालून मिक्स करून विस्तव बंद करा. दूध घालताना एकदम सर्व दूध घालून नका थोडे थोडे दूध घालून मिक्स करा.
मग मिश्रण एक प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करायला ठेवा. मिश्रण थंड झालेकी एकदा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. त्यामध्ये तगार, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून एकदा मिक्सरमध्ये थोडेसे ग्राइंड करून घ्या. म्हणजे सर्व छान एकजीव होईल. किंवा हातानी चांगले मळून घ्या. जास्त कोरडे वाटले तर अजून 1 टे स्पून तूप घालून मळून घ्या.
एका प्लेटमध्ये थोडे तगार घ्या. मग मळलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून प्लेट मधील तगार मध्ये घोळून घ्या. अश्या प्रकारे सर्व गोळे बनवून तगार मध्ये घोळून घ्या.
सर्व पेढे बनवून झालेकी डब्यात भरून ठेवा.
How to make Tagar or Bura (Boora) Sugar you can be seen here: Tagar or Bura Sugar