घरच्या घरी सोप्या पद्धतीने बतासे लक्ष्मी पूजनसाठी कसे बनवायचे
Homemade Zatpat Batasha For Lakshmi Puja Recipe in Marathi
दिवाळी मध्ये लक्ष्मी पूजन मध्ये साळीच्या लाहया व बतासे ह्याचे खूप महत्व आहे. दिवाळी हा सण धन व ऐश्वर्य च्या प्राप्तीचा सण आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चा करून जीवनभर धन-संपती मिळावी म्हणून प्रार्थना करतात.
साळीच्या लाहया व बतासे लक्ष्मी माताला नेवेद्य म्हणून दाखवतात. त्याचे महत्व म्हणजे व्यावहारिक व ज्योतिष शास्त्रा नुसार काही कारणा साठी आहे. साळीच्या लाहया ह्या तांदळा पासून बनवतात. भाताची शेती ही दिवाळीच्या वेळेस तयार होते. म्हणून तीच्या लाहया बनवून भोग दाखवतात.
दिवाळी हा सण धन व वैभवच्या प्राप्तीचा सण आहे व धन वैभवचा दाता शुक्र ग्रह मानला जातो. शुक्र ग्रहाचे धान्य भात (तांदूळ) आहे. तसेच शुक्र ह्या ग्राहाला प्रसन्न करण्यासाठी लाहया व बतासे भोग म्हणून दाखवतात.
The Marathi language video Homemade Zatpat Batasha For Lakshmi Puja be seen on our YouTube Channel of: Homemade Zatpat Batasha For Lakshmi Puja
बतासे कसे बनवायचे ते पाहू या
साहीत्य:
1 वाटी साखर
1 टी स्पून साजूक तूप
½ वाटी पाणी किंवा साखर बुडेल एव्हडे
फूड कलर पाहिजे असल्यास
1 टी स्पून तूप प्लेटला लावण्यासाठी
कृती:
एक स्टीलच्या प्लेटला तूप लाऊन घ्या.
एका छोट्या नॉन स्टिक कढईमद्धे साखर व पाणी घालून मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. साखर पूर्ण विरघळलिकी त्याचा दोन तारी पाक करून घ्या. पाक तयार झालकी नाही ही पाहण्यासाठी एक छोट्या स्टीलच्या प्लेटमध्ये 2-3 थेंब पाक घाला त्या पाकाची लगेच गोली झाली पाहिजे. पाक व्हायला लागला की लेगेच त्यामध्ये तूप घालून मिक्स करा. तूप घातल्यानी बतासे छान खुट खुटीत होतात.
पाक झाला की एका टी स्पून ने पाक घेऊन तूप लावलेल्या प्लेटमध्ये जाडसर गोलाकार घालावा. पाक घट्ट असल्यामुळे लगेच घट्ट होईल. अश्या प्रकारे सर्व बतासे घालून घ्या. हवा असेल तर फूड कलर सुद्धा घालू शकता.
बतासे लगेच थंड होतात. तयार बतासे लक्ष्मी माताला भोग म्हणून दाखवा.
टीप:
1. आपण बतासे स्टीलच्या प्लेटमध्ये घालू शकतो किंवा आप्पे पात्रामद्धे किंवा सिलिकॉन मोल्ड मध्ये सुद्धा घालू शकता.
2. बतासे प्लेटमध्ये घालत असताना पाक साखरे सारखा व्हायला लागला तर परत त्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून पाक बनवून परत बतासे घालू शकता.