झटपट सोप्या पद्धतीने घरी बनवा तगार किंवा बुरा साखर शक्कर
How to Make Tagar or Bura (Boora) Sugar at Home Recipe In Marathi
तगार किंवा बुरा साखर ह्या पासून बाजारातील मिठाई दुकानात मिठाई, लाडू किंवा पेढे बनवतात. बुरा साखर वापरुन बनवलेले लाडू चवीला अगदी निराळे व चविष्ट लागतात.
The Marathi language video How to Make Tagar or Bura (Boora) Sugar at Home be seen on our YouTube Channel of How to Make Tagar or Bura (Boora) Sugar at Home
तगार आपल्याला बाजारात मिळते पण थोडे महाग असते. त्यापेक्षा आपण झटपट घरी बनवू शकतो. तगार बनवताना ते साखरेचा पाक बनवून बनवतात. ते अगदी रवाळ असते. लाडू, पेढे किंवा मिठाई बनवताना पिठी साखर ण वापरता बुरा शक्कर वापरावी.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 1 कप
साहीत्य:
1 कप साखर
½ कप पाणी (त्यापेक्षा थोडेसे कमी घेतले तरी चालेल)
1 टे स्पून दूध
1 टी स्पून तूप
कृती:
पॅन किंवा कढई गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये साखर व पाणी घालून मंद विस्तवावर साखर विरघळायला ठेवा. साखर पूर्ण विरघळलिकी त्यामधील बाजूनी जी काय घाण आली असेल ती काढून टाका. मग त्यामध्ये दूध घालून मिक्स करा. बाजूनी परत जर फेस आला तर काढून टाका. आता त्यामध्ये तूप घालून मिक्स करा. तूप घातल्याने बुरा साखर छान रवाळ होईल आजिबात चिकट होणार नाही व चवीला सुद्धा छान लागेल. साखर आता अगदी घट्ट व्हायला लागली की लगेच विस्तव बंद करा. मिश्रण सारखे हलवत रहा, म्हणजे साखर छान रवाळ होईल काही गुठल्या झाल्या असतील तर मोडून टाका.
आता साखर थंड झाल्यावर बाउल मध्ये किंवा डब्यात काढून ठेवा. आता अश्या प्रकारची साखर आपण मिठाई किंवा पेढा किंवा लाडू बनवताना वापरू शकतो.