ताजे मटार वर्षभर कसे स्टोर करायचे
How to store Green Peas for 1 year Or Homemade Frozen Peas in Marathi
आता हिवाळ्याच्या सीझनमध्ये हिरवे ताजे मटार बाजारात अगदी स्वस्त मिळतात मग आपण हे मटार वर्षभर साठून ठेवले तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा वापरता येतात.
The Marathi language video How to store Green Peas for 1 year Or Homemade Frozen Peas be seen on our YouTube Channel of How to store Green Peas for 1 year Or Homemade Frozen Peas
मटार आपण अगदी सोप्या पद्धतीने वर्षभर साठवून ठेवता येतात. त्यासाठी फक्त 2-3 टिप्स लक्षात ठेवायला पाहिजे. मटारचे बरेच पदार्थ बनवता येतात. कधी घरात भाजी नसेल किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर स्टोर केलेले मटार वापरुन आपण छान पदार्थ बनवू शकतो.
मटार मध्ये लोह, जिंक, मैंगनीज, कॉपर ही अधिक प्रमाणात असते. त्यामुळे त्याच्या सेवणाने आपल्या शरीरातील बरेच रोज कमी होतात कारण मटार मध्ये एंटीऑक्सीडेंट चे गुण आहेत. त्यामुळे आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ति वाढते व आपण शरीर रोगासाठी लढू शकते.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 1 किलो ग्राम
साहीत्य:
1 किलो ग्राम ताजे हिरवे मटार
1 टे स्पून साखर
झिपलॉक बॅग
कृती: प्रथम ताजे मटार सोलून धुवून घ्या. एका मोठ्या आकाराच्या भांड्यात मटार बुडून वरती अजून पाणी राहील तेव्हडे पाणी गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये 1 टे स्पून साखर घालून मिक्स करून त्यामध्ये सोललेले मटार घालून 2 मिनिट उकळून घ्या.
मग विस्तव बंद करून मटार चाळणीमध्ये काढून घ्या. पाणी पूर्ण निथळून जाऊदे. दुसऱ्या एका भाड्यात थंड (फ्रीजमधील) पाणी घेऊन त्यामध्ये मटार घाला म्हणजे मटार ची कूकिंगची प्रक्रिया थांबेल. नंतर मटार परत चाळणीवर काढून घ्या. पाणी पूर्ण निथळून जाऊदे.
आता प्लॅस्टिक पिशवी किंवा एयर टाईट डब्बा किंवा झिप लॉक बॅग घेऊन त्यामध्ये मटार ठेऊन डीप फ्रीजमध्ये ठेवा. ही मटार आपण वर्षभर ठेऊ शकतो. जेव्हा पाहिजे तेव्हा पाहिजे तेव्हडे मटार काढून पाण्यात 10 मिनिट ठेवून (म्हणजे परत छान ताजे तवाने होईल) वापरा. बाकीचे परत डीप फ्रीजमध्ये ठेवा.