कडीपत्ता औषधी गुणधर्म इन मराठी
Kadi Patta Kari Patta Aushadhi Gundharm Fayde In Marathi
कडीपत्ता ह्या पानांचा उपयोग दक्षिण व महाराष्टमध्ये बऱ्याच प्रमाणात केला जातो. कढी बनवताना ह्या पानांचा उपयोग केला जातो त्यामुळे कढीला छान स्वाद येतो म्हणून त्याचे नाव कडीपत्ता आहे. आपण कडीपत्ता चा उपयोग करतो त्याचे कारण काय आहे ते आपण पाहू या.
डायबीटीज, कफ, आयर्न व फॉलिक अॅसिड, त्वचा रोग, केस दाट, काळेभोर व मजबूत, पचन ह्यावर गुणकारी
The Marathi language video Kadi Patta Kari Patta Aushadhi Gundharm Fayde be seen on our YouTube Channel of Kadi Patta Kari Patta Aushadhi Gundharm Fayde
1. आपण डायबीटीज ह्या रोगा पासून पीडित असाल तर कडीपत्ता हा नियमित वापरात आणा तसेच ब्लड शुगर नियंत्रणात आणायला मदत होते.
2. जर कफ जल असेल व तो सुकला असेल किंवा छातीमध्ये साठला असेल तर कडीपत्ता आपल्याला खूप फायदेशीर आहे. त्यासाठी कडीपत्ताची पाने वाटून किंवा कडीपताची पावडर मधामध्ये मिक्स करून त्याचे सेवन करावे.
3. आयर्न व फॉलिक अॅसिड हे कडीपत्तामध्ये आहे. आपल्या शरीरात आयर्न व फॉलिक अॅसिड ची कमतरता निर्माण झाली असेलतर कडीपत्ताचे सेवन जरूर करावे. तसेच एनिमियाच्या समस्या पासून आपला बचाव होतो. त्यामुळे रोज उपाशी पोटी खजूर व कडीपात पाने खावी.
4. त्वचा रोग संबंधित रोग ह्यासाठी कडीपात खूप फायदेशीर आहे. जर चेहऱ्यावर पिंपल मूहासे असतील किंवा अजून काही त्वचा संबंधित रोग असतील तर रोज कडीपत्ता सेवन करावा किंवा पिंपल्स वर कडीपत्ताची पेस्ट करून लावावी.
5. आपले केस दाट, काळेभोर व मजबूत बनवायचे असतील तर खोबरेल तेलामध्ये कडीपता पाने घालून उकळून त्याचे तेल केसांच्या मुळाशी लाऊन मालीश करावे.
6.पचन संबंधित काही समस्या असतील तर कडीपत्ता पाने वाटून ती ताकामध्ये घालून मिक्स करून त्याचे सेवन करावे. तसेच त्यामुळे पोट बिघडले असेलतर ते पॅन ठीक होते व पोटाच्या तक्रारी सुद्धा दूर होतात.
7. 6-7 कडीपता पाने एक कप पाण्यात 5 मिनिट उकळून घ्या मग ते पाणी गाळून कोमट झाले की प्या. त्यामुळे केसा संबंधित तक्रारी तसेच आपल्या शरीराच्या अजून काही तक्रारी निघून जातील.