करवा चौथ 2020 (Karwa Chauth 2020) व्रत, मुहूर्त पूजा व कहाणी
Karwa Chauth 2020 Vrat Muhurat Puja And Katha In Marathi
चंद्राला खर म्हणजे आयुष्य, सुख व शांतीचे प्रतीक मानले जाते. म्हणून करवा चौथ ह्या दिवशी वैवाहिक महिला सुख शांती व आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळाव म्हणून पूजा करतात.
The Marathi language video Karwa Chauth 2020 Vrat Muhurat Puja And Katha be seen on our YouTube Channel of: Karwa Chauth 2020 Vrat Muhurat Puja And Katha
करवा चौथ 2020 (Karwa Chauth 2020) चे व्रत कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या दिवशी केले जाते. मातीच्या कलशमध्ये पाणी ठेवतात त्याला करवा असे म्हणतात व चतुर्थी या तिथीला चौथ असे म्हणतात. ह्या दिवशी गणेशजी, गौरी व चंद्र ह्याची पूजा करतात. चंद्राला सुख शांतीचे प्रतीक मानतात म्हणून महिला चंद्राची पूजा करतात.
करवा चौथ चे व्रत बुधवार, 4 नव्हेंबर 2020 ह्या दिवशी आहे. करवा चौथ ह्या दिवशी माता पार्वतीची पूजा केल्याने अखंड सौभाग्यचे वरदान प्राप्त होते. पार्वती माता बरोबर गणेशजी व कार्तिक ह्याची पण पूजा करतात. ह्या पूजेमध्ये करवा म्हणजे कलश फार महत्वपूर्ण आहे. नंतर कलश ब्राह्मण किंवा वैवाहिक महिलेला दान दिला जातो.
करवा चौथ ह्या दिवसाची महिला अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. ह्या दिवशी निर्जल व्रत ठेवतात. पूर्ण दिवश पाणी सुद्धा ग्रहण करायचे नाही.
करवा चौथचे नियम
करवा चौथ ही व्रत फक्त लग्न झालेल्या महिलानि करायचे असते. ह्या व्रताच्या दिवशी सूर्योदय ते चंद्रोदय ह्या काळात अगदी निर्जल व्रत करतात. व्रत करणाऱ्या महिलानी काळे किंवा पांढरे वस्त्र घालायचे नाही. लाल रंगाचे वस्त्र सर्वात चांगले मानले जाते. तसेच पिवळे वस्त्र सुद्धा घालू शकतात. ह्या दिवशी महिलानि पूर्ण श्रृंगार करावा.
पूजा थाळी कशी सजवावी व काय खास करावे.
रात्री चंद्रोदय च्या वेळी चंद्राचे दर्शन घेताना थाळी सजवलेली घ्यावी. थाळीमध्ये दिवा, सिंदूर, अक्षता, कुंकू, रोली व तांदळाच्या पासून बनवलेली मिठाई किंवा कोणतीपण पांढरी मिठाई ठेवावी. संपूर्ण श्रृंगार करून करवे मध्ये पाणी भरून घ्यावे. गौरी माता व गणेशजीची पूजा करावी. चंद्रोदय झाल्यावर चाळणी मधून किंवा पाण्यामध्ये चंद्र पहावा. मग करवा चौथची कहाणी आईकावी. मग आपल्या पतीच्या दीर्घआयुष्यची प्रार्थना करावी. आपली सासू किंवा कोणी सुद्धा वयोवृद्ध महिलाला श्रृंगारचे सामान देवून आशीर्वाद घ्यावा. चंद्र दर्शन झाल्यावर पतीच्या हातून पाणी ग्रहण करून मगच आपले निर्जला व्रत सोडतात. त्या अगोदर एक तास शंकर, पार्वती, गणेशजी व कार्तिक स्वामी ह्यांची पूजा करतात. पूजा करताना महिलांनी पूर्व दिशेला बसून पूजा करावी.
करवा चौथ पूजा शुभ मुहूर्त
करवा चौथ पूजा शुभ मुहूर्त बुधवार 4 नव्हेंबर संध्याकाळी 05 वाजून 34 मिनट पासून संध्याकाळी 06 वाजून 52 मिनट पर्यन्त आहे. चंद्रोदय संध्याकाळी 07 वाजून 57 मिनट वाजता दर्शन देणार.
चंद्राची पूजा का करतात
पौराणिक मान्यतानुसार पती-पत्नी ह्याचे संबंध अधिक मजबूत होतात तसेच चंद्र आयुष, सुख शांतीचे प्रतीक मानतात त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख समृद्धी मिळून पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते.
करवा चौथ व्रत कहाणी:
करवा चौथ ही व्रत करणाऱ्या महिला ही कहाणी आईकतात.
एका गावात एक सावकार राहत होता त्याला 7 मुले व एक मुलगी होती. मुलीचे नाव करवा होते. एकदा करवा चौथ च्या दिवशी रात्री घरातील सर्वजण जेवण करायला बसले. तेव्हा करवा मात्र चंद्रोदय होण्याची वाट पाहत होती. भावांनी करवाला भोजन करण्यास आग्रह केला पण करवा आईकत नव्हती भावांना तिची हालत पहावत नव्हती. तिने सांगितले की चंद्र पाहिल्यावर मगच जेवण करणार. मग लहान भाऊ पिंपळाच्या झाडावर चढून त्याने एक दिवा लावला व तो म्हणाला की चंद्रोदय झाला. करवाला माहीत नव्हते की भावाने अशी युक्ति केली आहे तिने उपवास सोडायला सुरवात केली व तिला आपले पती आता जीवित नाहीत असा निरोप मिळाला. ती दुखी झाली व पूर्ण एक वर्ष ती आपल्या मृत पावलेल्या पती बरोबर बसून राहिली. मग पुढच्या करवा चौथला तिने व्रत करून पूजा अर्चा केली व सर्व नियम पाळून तिचे पती परत जीवंत झाले