महाराष्ट्रियन पद्धतीने खमंग टिकाऊ क्डीपत्ता चटणी रेसीपी
Maharashtrian Style Kadipatta Churney Recipe in Marathi
कडीपत्ता आपल्याला सर्वाना परिचयाचा आहे. कडीपत्ताची फोडणी घालून आपला पदार्थ अगदी चवीष्ट बनतो. कडीपत्ता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. कढी, पोहे, उपमा, भाज्या आपल्या छान बनतात.
The Marathi language video Kadipatta Churney Karipatta Chutney be seen on our YouTube Channel of Kadipatta Churney Karipatta Chutney
कडीपत्ता हा दक्षिण भारत ह्या भागामध्ये खूप वापरला जातो. पण महाराष्टमध्ये सुद्धा ह्याचे वापरायचे प्रमाण अधिक आहे. त्याचा सुगंध आपलीला मोहून टाकतो. कडीपत्ता चटणी ही महाराष्ट्रियन पारंपारिक पद्धतीने बनवली आहे.
कडीपत्ताच्या सेवणाने ब्लड शुगर नियंत्रणात राहते. सर्दी, कफ झाला असेलतर तो सुद्धा निघून जातो, आयर्न व फॉलिक अॅसिड असते त्यामुळे अशक्त पणा दूर होतो, त्वचा रोग किंवा पिंपल्स साठी खूप फायदेमंद आहे, आपले केस दाट मजबूत व काळेभोर बनवायचे असतील तर कडीपत्ताचे तेल बनवून केसांना मालीश करा. पचन संबंधीत काही तक्रारी असतील तर दूर होतील.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणांसाठी
साहीत्य:
20-25 कडीपत्ता पाने
4 टे स्पून सुके खोबरे (किसून)
2 टे स्पून फुटाणा डाळ (रोसटेड डाळ)
2 सुक्या लाल मिरच्या
1 टी स्पून तीळ
1 चिंचेचे बुटुक
मीठ चवीने
कृती:
नॉन स्टिक तवा गरम करून त्यामध्ये कडीपत्ता पाने, सुके खोबरे, पंढरपुरी डाळ, लाल मिरची व तीळ घालून 12-15 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. सर्व साहित्य भाजून झाल्यावर चिंच व मीठ चवीने घालून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या.
कडीपत्ता चटणी आपण चपाती किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करू शकतो.
The Marathi language video Kadi Patta Kari Patta Aushadhi Gundharm Fayde be seen on our YouTube Channel of Kadi Patta Kari Patta Aushadhi Gundharm Fayde