परफेक्ट बेसन लाडू बनवताना एक चीज घाला अगदी अप्रतिम लागतात
Outstanding Different Style Besan Ladoo For Diwali Faral In Marathi
दिवाळी म्हंटले की लाडू पाहिजेच. आपण बेसन लाडू बनवताना नुसते बेसन वापरुन बनवतो किंवा रवा व बेसन वापरुन सुद्धा लाडू बनवतो. रवा वापरण्याच्या एवजी आपण गव्हाचे पीठ सुद्धा वापरुन अगदी सुंदर चवीस्ट लाडू बनवू शकतो. अश्या प्रकारचे लाडू अगदी परफेक्ट बनतात कधीसुद्धा बिघडत नाहीत तुम्ही सुद्धा बनवून बघा नक्की सगळ्याना आवडतील.
बेसन व गव्हाचे पीठ वापरुन लाडू खूप छान बनतात व बनवायला सुद्धा सोपे आहेत. अश्या प्रकारचे लाडू आपण इतर वेळी किंवा दिवाळीच्या वेळी सुद्धा बनवू शकतो.
The Marathi language video Outstanding Different Style Besan Ladoo For Diwali Faral be seen on our YouTube Channel of: Outstanding Different Style Besan Ladoo For Diwali Faral
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: 18-20 लाडू बनतात.
साहीत्य:
1 कप बेसन
1 कप गव्हाचे पीठ
½ कप साजूक तूप
1 ½ कप पिठी साखर
¼ टी स्पून वेलची पावडर
¼ कप काजू, बदाम तुकडे करून
कृती: एका नॉनस्टिक 2 टे स्पून कढईमद्धे तूप गरम करून घ्या. मग त्यामध्ये बेसन व गव्हाचे पीठ घालून मिक्स करून मंद विस्तवावर छान खमंग भाजून घ्या.
बेसन व गव्हाचे पीठ छान खमंग भाजून झाल्यावर दोन टे स्पून तूप घालून मिक्स करून घ्या. किंवा बाकीचे राहिलेले तूप घातले तरी चालेल. मग एका बाउलमध्ये मिश्रण काढून घेऊन थोडे कोमट होऊ द्या.
मग त्यामध्ये वेलची पावडर, ड्राय फ्रूट व पिठी साखर घालून चांगले मळून घ्या. मग त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या. मग तयार झालेले लाडू डब्यात भरून ठेवा.
टीप: जर आपल्याला वनस्पति तूप वापरायचे असेल तर सुरवातीला वनस्पति तूप घालून त्यामध्ये थोडे साजूक तूप घाला मग बेसन व गव्हाचे पीठ भाजून घ्या.