स्वादिष्ट पेरूची आंबट-गोड तिखट भाजी रेसिपी
Tasty Spicy Peruchi (Guava) Ambat-God Tikhat Bhaji Recipe In Marathi
पेरू पाहताच आपल्याला तिखट मीठ लाऊन खावेशे वाटतात. पूर्वीच्या काळी शाळेच्या बाहेर कोणत्यापण आजी किंवा आजोबा पेरू, चिंचा, आवळे, बिस्किट, चॉकलेट घेऊन विकत बसायचे व पेरू मधोमध कापून त्यामध्ये लाल मिरची पावडर व मीठ घालून द्यायचे मग मुले अगदी खुश व्हायची. आता त्या नुसत्या आठवणी राहिल्या आहेत. पेरू हे चवीला आंबट-गोड तुरट असतात.
The Marathi language video Tasty Spicy Peruchi (Guava) Ambat-God Tikhat Bhaji be seen on our YouTube Channel of Tasty Spicy Peruchi (Guava) Ambat-God Tikhat Bhaji
पेरू ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. पेरूमद्धे सात्विक गुण आहेत. बुद्धीवर्धक लोकानी पेरूचे सेवन करावे. विषमज्वर झालेल्या लोकानी पेरू खावा त्यामुळे विषमज्वराचे जंतु मरण पावतात. पेरूमद्धे जीवनसत्व “c”, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह व ग्लुकोज आहे.
पेरूची भाजी खूप चवीष्ट लागते. आपण चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहीत्य:
3 मध्यम आकारचे पेरू
1 छोटा कांदा (चिरून)
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
2 टे स्पून गूळ
¼ टी स्पून हळद
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1 टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
1 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
¼ टी स्पून हिंग
¼ कप पाणी
कृती: प्रथम पेरू स्वच्छ धुवून त्याच्या छोट्या फोडी कापून घ्या. बियाचा सर्व भाग काढून घ्या. कांदा व कोथबिर चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून मोहरी जिरे, हिंग घालून मग त्यामध्ये चिरलेला कांदा घालून 2 मिनिट परतून घ्या. कांदा परतून झालकी त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून चवीने मीठ घाला मग त्यामध्ये पाणी घालून मिक्स करून पेरूच्या फोडी घालून मिक्स करा. कढईवर झाकण ठेवा झकणावर थोडेसे पाणी घालून 5-7 मिनिट मंद विस्तवावर भाजी शिजयला ठेवा. मधून मधून भाजी हलवून घ्या.
मग झाकण काढून गूळ व कोथबिर घालून भाजी मिक्स करून 2-3 मिनिट भाजी शीजू द्या. भाजी तयार झालीकी बाउल मध्ये काढून कोथबिर घालून सर्व्ह करा.