अगदी सोप्या पद्धतीने मिनिटात किलोभर लसूण कसा सोलायचा
Trick for how to peel 1 kg Garlic in one minute In Marathi
आपल्याला रोजच्या जेवणात लसूण हा लागतोच. तसेच लसूण सोलायला खूप वेळ जातो. मार्केटमध्ये आपल्याला सोललेला लसूण मिळतो पण तो खूप महाग पडतो. आपण जर घरीच अगदी सोप्या पद्धतीने (ट्रिकने) झटकन जास्त लसूण सोलून ठेवला तर आपला रोजचा वेळ जाणार नाही. त्यात आजकालच्या गृहीणीना घर व ऑफिस सांभाळायचे असते म्हणजेच तारेवरची कसरत करत त्या सर्व कामे करत असतात. आपला रोजचा वेळ वाचवा म्हणून सुटीच्या दिवशी अश्या प्रकारे आपला आठोड्याच्या लागेल तेव्हडा लसूण सोलून ठेवावा.
लसूण सोलताना अगदी सोपी पद्धत वापरली आहे. ही ट्रिक पाहिल्यावर आपल्याला वाटेल की अरेचा ह्या अगोदर ही ट्रिक आपल्याला का नाही समजली.
The Marathi language video Trick for how to peel 1 kg Garlic in one minute be seen on our YouTube Channel of Trick for how to peel 1 kg Garlic in one minute
साहीत्य:
1 किलो लसूण
2 लिटर पाणी किंवा लसूण बुडेल एव्हडे पाणी
कृती: प्रथम लसूण कांड घेऊन त्यापासून लसूण पाकळ्या वेगळ्या करून घ्या. बाकीचा कचरा काढून फक्त पाकळ्या घ्या.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात लसूण पाकळ्या बुडून वरती पाणी राहील एव्हडे पाणी घ्या. भांडे विस्तवावर ठेऊन पाणी कोमट झाले की लसूण पाकळ्या कोमट पाण्यात ठेवा. एक मिनिट तसच पाण्यात ठेवा. पाणी अजून थोडेसे गरम होईल मग विस्तव बंद करा.
मग बोटांनी लसूण थोडा चोळा म्हणजे त्याचे साले थोडी मोकळी होतील. आता लसूणची साले काढा बघा कशी पटापट झटपट निघतात. सगळ्या लसूणची साले काढून झाली की मग डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा पाहिजे तेव्हा लसूण काढून वापरा.
लसूण सोलायची अगदी सोपी पद्धत आहेना.