तुळशीचे लग्न तुळशी विवाह महत्व मुहूर्त व पुजाविधि
Tulasi Vivah 2020 Importance Muhurat Puja Vidhi In Marathi
तुळशी विवाह हा दरवर्षी दिवाळी नंतर साजरा करतात. ह्या वर्षी 26 नोव्हेंबर 2020 गुरुवार कार्तिक शुद्ध द्वादशी म्हणजेच देव उठनी एकादशी पासून ते कार्तिक पूर्णिमा 30 नोव्हेंबर 2020 सोमवार ह्या दिवसा पर्यन्त आहे. ह्या दिवसांमध्ये आपण कधी सुद्धा तुळशीचे लग्न करू शकतात. खर म्हणजे तुळशीचे लग्न कार्तिक शुद्ध द्वादशी ह्या दिवशी करतात. देव उठनी एका दशी ह्या दिवशी भगवान नारायण चार महिन्या नंतर उठतात. भगवान विष्णु यांना तुळशी खूप प्रिय आहे. तिचे दुसरे नाव वृंदा असे आहे.
The Marathi language video Tulasi Vivah 2020 Importance Muhurat Puja Vidhi be seen on our YouTube Channel of Tulasi Vivah 2020 Importance Muhurat Puja Vidhi
आपल्या मध्ये पूर्वीच्या पासून एक पद्धत आहे की घरातील जी जेष्ठ कन्या असेल तिचा विवाह प्रथम केला जातो तर मग घरातील जेष्ठ कन्या म्हणजे तुळशी होय. तुळशीचा विवाह श्री कृष्ण ह्यांच्याशी लावल्यावर आपल्या कडील विवाह करण्याची पद्धत आहे. तुळस ही आपल्या अंगणाची शोभा वाढवते. दरवर्षी तुळशीचे लग्न अगदी धूम धडाक्यात लावले जाते. काही ठिकाणी सार्व जनिक विवाह सुद्धा केला जातो. पण ह्या वर्षी Covid-19 च्या मुळे सार्वजनिक विवाह करता येणार नाही. ह्या वर्षी आपण ऑनलाइन तुळशीचे लग्न करू शकता व त्या प्रकारे सुद्धा आनंद घेऊ शकता. किंवा आपण Whatsapp वर Facebook वर सुद्धा शुभेच्छा देवू शकता. ह्या वर्षी आपल्याला अगदी साधे पणाने साजरे करावे लागणार आहे. प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजवत येणार नाहीत. तसेच सोशल डिस्टन्स ठेवून तोंडाला मास्क लाऊन आपल्याला तुळशीचे लग्न करायचं आहे. कारण काही ठिकाणी स्पीकर लावून मंडप घालून हा विवाह मोठ्या प्रमाणात साजरा करतात.
आपल्या हिंदू धर्मात बहुसंख्य लोकांच्या घरासमोर तुळशीचे रोप लावलेले असते. तसेच फ्लॅट मध्ये राहणाऱ्या कडे सुद्धा बाल्कनी मध्ये तुळशीचे रोप लावलेले दिसते. तुळशी ला आपण देवाच मानतो व रोज तिच्या समोर सडा, रांगोळी काढून दिवा आगरबती लावतो. कार्तिक महिन्यात तुळशीच्या समोर दिवा लावल्याने आपलयाला भगवान विष्णु यांचे आशीर्वाद मिळतात व फळ प्राप्ती होते.
तुळशी विवाह शुभ मुहूर्त:
एकादशी प्रारंभ 25 नव्हेंबर मध्य रात्री 2:45 मिनिट पासून एकादशी समाप्ती 26 नव्हेबर सकाळी 5: 10 मिनिट पर्यन्त
द्वादशी प्रारंभ 26 नव्हेंबर सकाळी 5: 10 मिनिट ते 27 नव्हेंबर सकाळी 7: 46 मिनिट पर्यन्त
तुळशी विवाह पूजा विधी:
• तुळशी विवाह ह्या दिवशी तुळशी वृंदावन स्वच्छ व सुशोभीत करतात. त्याच्या पुढे सडा रांगोळी काढतात.
• तुळशी वृंदावनच्या वर उसाचा मंडप बांधतात. तुळशीला हळद-कुंकू लावतात. मग तुळशी पुढे आवळा व चिंच ठेवावे.
• मग कलश तयार करावा. त्यासाठी स्वच्छ कलश घेऊन त्यावर चारी बाजूनी हळद-कुंकूची बोटे लावावी. म्हणजेच हळद कुंकुवाची बोटांनी पाच रेघा उमटाव्या. मग कलशमध्ये पाणी, पाच विडयाची पाने व नारळ ठेवावा.
• तुळशी जवळ समई लावावी व गणपतीची प्रतिमा ठेवून हळद-कुंकू लावून फूल वाहून गणेश पूजन करावे.
• मग शालिग्राम घेऊन पिवळ्या रंगाचे वस्त्र घेऊन त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करून तुळशी वृंदावनच्या जवळ ठेवावे.
• तुळशील हिरवे वस्त्र, फुलाची वेणी व कापसाचे वस्त्र वाहावे. नंतर तुळशीच्या वर लाल रंगाचे छोटेसे वस्त्र घालावे. तुळशीला पाणी घालून वाटी बांगडी, सौभाग्य अलंकार घालावे.
• मग शंख पूजन करून हळद-कुंकू वाहून फूल अर्पण करावे. तुपाचा दिवा लावावा.
• तुळशीची ओटी भरण्यासाठी हिरव्या रंगाचे कापड, अक्षता, हळद-कुंकू, पान सुपारी, हळकुंड, बदाम, केळी मोसंबी, व नारळ ठेऊन ओटी भरावी. मग समईचे पूजन करावे. आता तुळशीला मुंडवळ्या बांधाव्या.
• श्री कृष्णाची प्रतिमा घेऊन पूजा करून हळद-कुंकू, अक्षता फुले, हार घालून पूजन करावे. तुळशी वृंदावनला हार घालावा.
• तुळशी वृंदावन समोर एक पाट ठेवून पाटाला सुशोभीत करावे व श्री कृष्णची प्रतिमा ठेऊन मध्ये अंतर पाट ठेवून मंगल अष्टक म्हणावे. आरती म्हणून प्रसाद म्हणून मिठाई, फराल व बतासे वाटतात।