चटपटीत पेरू पुदिना चटणी रेसीपी
Zatpat Peru Pudina Chutney Guava Chutney Amrud Chutney Recipe In Marathi
चटणी ह्या पदार्थांनी तोंडाला छान चव येते. आपण नानाविध प्रकारच्या चटण्या बनवतो. महाराष्ट्रात चटणी ही जेवताना हवीच असते त्याशिवाय आपले जेवणाचे ताट कसे पूर्ण होणार. ह्या अगोदर आपण बऱ्याच प्रकारच्या चटण्या पाहिल्या आता आपण पेरूची स्वादिष्ट चटणी पाहणार.
The Marathi language video Tasty Zatpat Peru Pudina Chutney Guava Chutney Amrud Chutney be seen on our YouTube Channel of Tasty Zatpat Peru Pudina Chutney Guava Chutney Amrud Chutney
पेरूची चटणी बनवताना पुदिना वापरला आहे. त्यामुळे चटणी मस्त लागते. तसेच पेरू हा आंबट-गोड असतो. त्यामुळे चटणी अजून खूप छान लागते.
पेरू ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. पेरूमद्धे सात्विक गुण आहेत. बुद्धीवर्धक लोकानी पेरूचे सेवन करावे. विषमज्वर झालेल्या लोकानी पेरू खावा त्यामुळे विषमज्वराचे जंतु मरण पावतात. पेरूमद्धे जीवनसत्व “c”, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह व ग्लुकोज आहे.
पेरूची चटणी बनवायला सोपी आहे व झटपट होणारी तसेच अगदी निराळी आहे. आपण चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 4 जनासाठी
साहीत्य:
1 कप पेरूचे तुकडे
2 टे स्पून कोथबिर (चिरून)
8-10 पुदिना पाने
1 हिरवी मिरची
½” आले (तुकडा)
½ टी स्पून जिरे
1 टी स्पून साखर
½ टी स्पून लिंबुरस
मीठ चवीने
कृती: प्रथम पेरू धुवून त्याच्या फोडी करून बिया काढा. आले, पुदिना व कोथबिर धुवून चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात चिरलेला पेरू, आले व हिरवी मिरची घालून थोडे वाटून घ्या. मग त्यामध्ये कोथबिर, पुदिना, लिंबुरस, जिरे, साखर व मीठ घालून अगदी एक छोटा चमचा पाणी घालून थोडी जाडसर चटणी वाटून घ्या.
पेरूची चटणी चपाती बरोबर किंवा पराठा बरोबर सर्व्ह करा.