सोपे 8 उपाय केले तर लक्ष्मी ची कृपा आपल्यावर सदैव राहून धनामध्ये वृद्धी होईल
8 Lakshmi Prapti Remedies For Money Wealth And Prosperity In Marathi
प्रतेक व्यक्तिच्या जीवनात चढ उतार येत असते. सुख आल्यावर दुख व परत सुख असा नियतीचा सिद्धांतच आहे. आपण म्हणतो ना सर्व दिवस एक सारखे नसतात. कधी कधी असे सुद्धा होते की काही जणांच्या जीवनात त्यांना त्यांचे भाग्य साथ देत नाही त्यामुळे त्यांच्या जीवनात फक्त दुख येते. दुखी राहिल्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात सारखे संकटांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये सुख व संपत्तिसाठी बरेच उपाय सांगितले आहेत. असे म्हणतात की जी व्यक्ति माता लक्ष्मीची मनपूर्वक पूजा अर्चा करते त्या व्यक्तिवर माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते. माता लक्ष्मी त्याची साथ कधी सोडत नाही.
The Marathi language video 8 Lakshmi Prapti Remedies For Money Wealth And Prosperity be seen on our YouTube Channel of 8 Lakshmi Prapti Remedies For Money Wealth And Prosperity
आपण माता लक्ष्मीचे अगदी सोपे उपाय केले तर आपले सुद्धा भाग्य चमकू शकते.
1. जर आपल्याकडे पैशाचे प्रश्न आहेत व म्हणावे तसे घरात धन येत नाही व टिकत नाही तर हा उपाय करून पहा त्यामुळे लक्ष्मी माताची कृपा तुमच्यावर सदैव राहील. शुक्रवार ह्या दिवशी श्रीसूक्त व लक्ष्मी सूक्त ह्याचे वाचन करावे. असे केल्याने लक्ष्मी माताची कृपा तुमच्यावर राहील.
2. घरामधील नकारात्मक ऊर्जा नाहीशी करण्यासाठी आठोडयातून एकदा पाण्यात मीठ घालून घारात पोंछा मारावा त्यामुळे घरात सुख शांती व समृद्धी राहते.
3. ज्योतिष शास्त्रनुसार माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करून आपल्या घरातील पूजाघरामध्ये लक्ष्मी माताच्या फोटो किंवा मूर्तीवर कमळाचे फूल अर्पित करा. असे केल्याने आपले पैशा संबंधीत प्रश दूर होतील.
4. शुक्रवार ह्या दिवशी माता लक्ष्मी ल सात्विक भोजन किंवा पांढरा गोड पदार्थ दाखवावा. माता लक्ष्मीला पांढरा रंग खूप प्रिय आहे. असे म्हणतात की माता लक्ष्मी ह्या मुळे प्रसन्न होते.
5. जर तुम्ही कोणत्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तर जाताना दही खाऊन बाहेर पडावे. असे म्हणतात की त्यामुळे आपले काम 100% होते.
6. धनामध्ये वृद्धी होण्यासाठी लक्ष्मी माताला कवडी, मखाना, व बताशे भोग म्हणून अर्पण करा असे केल्याने लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर सदैव राहते.
7. शुक्रवार हा दिवस लक्ष्मी माताचा आहे ह्या दिवशी घरातील पैसे ठेवण्याच्या ठिकाणी तसेच दुकान ऑफिसमध्ये तिजोरीच्या ठिकाणी कमळाचे फूल ठेवणे शुभ मानले जाते. मग एक महिना झाला की दुसरे नवीन फूल ठेवावे असे नियमित करावे. असे केल्याने पैशा संबंधीत प्रश्न निघून जातील.
8. अष्टमी ह्या दिवशी संध्याकाळी ईशानच्या दिशेला कोनामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावावा. दिवा लावताना कापसाच्या वातीच्या आयवजी लाल रंगाचा धागा वापरावा. त्याच बरोबर तुपामध्ये केसर घालावे. असे केल्याने धनलाभ होण्याचा संभव होतो.