वास्तु शास्त्रा नुसार घरातील व्यक्तीचे फोटो लावण्याची योग्य दिशा
According To Vastu Shastra Where To Place Family Photos At Home in Marathi
आपण पाहतो बऱ्याच लोकांच्या घरात घरातील सदस्याच्या फोटो फ्रेम लावल्या जातात. घरातील लहान मुले, फॅमिली फोटो किंवा मुला मुलींच्या लग्नाचे फोटो लावले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक फ्रेम बनवून फोटो लावतात. काही जणांना त्याची आवडसुद्धा असते किंवा हौससुद्धा असते. असे म्हणतात ना की हौसेला मोल नसते.
The Marathi language video According To Vastu Shastra Where To Place Family Photos At Home be seen on our YouTube Channel of According To Vastu Shastra Where To Place Family Photos At Home
आपण आपली हौस किंवा आवड जोपासावी पण त्यासाठी योग्य दिशा पाहून फॅमिलीचे किंवा आपले इतर फोटो लावावे. वास्तुशास्त्रा नुसार घरातील फोटो कोणत्या दिशेला लावावे त्याचे एक शास्त्र आहे. व त्याचा प्रभाव नेमका आपल्या जीवनावर पडतो. जर घरातील व्यतिनचे फोटो योग्य दिशेला लावले असतील तर सकारात्मक ऊर्जा घरात येते. पण जर चुकीच्या दिशेला फोटो लावले तर आपले घर नकारात्मक ऊर्जाने भरून जाते. वास्तु शास्त्रानुसार घरातील व्यक्तींचे फोटो योग्य त्या दिशेला लावले पाहिजे. असे केल्याने घरातील प्रेम संबंध राहतील. वास्तुशास्त्रानुसार घरातील व्यक्तींचे फोटो उत्तर दिशा, पूर्व दिशा किंवा उत्तर-पूर्व दिशा ह्या दिशेला लावाव्या. ह्या तिन्ही दिशा घरातील व्यक्तींच्या तस्वीरे किंवा फोटो लावण्यासाठी योग्य आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्यासुद्धा दिशेला घरातील व्यक्तींचे फोटो लावू नयेत.
तस्वीरें किंवा फोटो लावताना खालील गोष्टी ध्यानात ठेवाव्या.
देवाचे रौद्ररूप असणारी तस्वीरें किंवा युद्ध करतानाची म्हणजेच युद्धाची तस्वीरें लावू नयेत. त्यामुळे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा येऊन घरातील व्यक्तिमद्धे भांडणे किंवा वादविवाद निर्माण होतात.
घरातील स्वर्गवासी झालेल्या व्यक्तींचे फोटो नेहमी उत्तर दिशेला लावावे. तसेच पूजाघर किंवा इतर कोणत्यासुद्धा दिशेला लावू नये. त्यामुळे घरात शांती राहून पितृदोष रहात नाही.
घरामध्ये हनुमानजीची तस्वीर फक्त पूजा घरात ठेवावी किंवा लावावी. घरामध्ये इतर दिशेला लावल्यामुळे तिचे पावित्र्य जाणार नाही. तसेच जेव्हा मासिक काळ असेल तेव्हा आपली नजर हनुमानजिच्या फोटोवर जात नाही. म्हणजे कोणता सुद्धा दोष राहणार नाही व घरामध्ये शांती व तनाव होणार नाही.
घरामध्ये कुबेर भगवान ह्यांची तस्वीर लावू नये. कारण की कुबेर भगवान हे धनाचे देवता आहेत. म्हणून त्यांची पूजा घरात करायची नसते.
घरामध्ये ताजमहालचा फोटो किंवा मूर्ती ठेवू नये. तसेच डूबतानाची नाव किंवा जहाज, कारंजी, जंगली जानवर, काटेदार झाडांचे फोटो लाऊ नयेत त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते व आपल्या जीवनात चांगल्या घटना येत नाहीत.
घरामध्ये दक्षिण-पूर्व ही दिशा धन संबंधीत आहे. त्यामुळे ह्या दिशेला हिरव्यागार झाडांचे फोटो किंवा जंगलांचे फोटो लावले तर धन-संपत्ति वाढते. पण घरात दक्षिण पश्चिम कोना बेडरूममध्ये असेल त्याठिकाणी पाणी असणारे फोटो लावू नयेत.
घरामध्ये रडत असलेली व्यक्ति किंवा वाट पहात असलेल्या व्यक्तीचे फोटो लावणे अशुभ असते.
ह्या साध्य सोप्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपल्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहील.