संत्र्याची साल त्वचा व केसांचे सौंदर्य वाढते
Amazing Benefits of Orange Peel for Skin And Hair in Marathi
संत्र्याची साल टाकून देण्याच्या अगोदर त्याचे फायदे काय आहेत त्यासाठी हा पूर्ण विडियो नक्की पहा
संत्र्याचा सीझन आला की बाजारात भरपूर संत्री पाहायला मिळतात. आपण संत्री खावून झाल्यावर त्याची साल टाकून देतो. पण संत्र्याची साल टाकून न देता ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच आपल्या सौंदर्यच्या दृष्टीने किती हितावह आहेत ते पाहून तुम्ही संत्र्याची साल कधी सुद्धा टाकणार नाही.
The Marathi language video Amazing Benefits of Orange Peel for Skin And Hair be seen on our YouTube Channel of Amazing Benefits of Orange Peel for Skin And Hair
संत्र्याच्या सालामध्ये अॅंटी ऑक्सिडेन्ट ह्या गुणाचे तत्व आहे त्यामुळे आपले केस छान चमकदार होतात तसेच आपली त्वचा सुद्धा छान मुलायम व चमकदार होते. त्यासाठी हा प्रयोग एकदा करून पहा.
संत्र्याच्या सालाची पावडर बनवणे खूप सोपे आहे. त्यासाठी संत्र्याची साल कडक उन्हात वाळत ठेवा जेव्हा ती एकदम सुकतील तेव्हा मिक्सरमध्ये त्याची पावडर करून बाटलीमध्ये भरून ठेवा. अश्या प्रकारची संत्र्याची पावडर बाजारात खूप महाग मिळते व बऱ्याच सौदर्य प्रसाधना बनवण्यासाठी वापरतात.
1. आपल्या चेहऱ्याची त्वचा छान निखार येतो.
संत्र्याचा सालाची पावडर मध्यामद्धे मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर लावल्याने उन्हामुळे आपली त्वचा काळवंडते (tan) तो काळेपणा ह्याने दूर होतो. त्वचा स्वच्छ होऊन निखार येतो.
2.आपल्या त्वचेची सूक्ष्म छिद्र मोकळी होतात.
संत्र्याच्या पावडरमध्ये दही मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची सूक्ष्म छिद्र मोकळी होऊन ब्लॅक हेडस् साफ होतात.
3.चेहऱ्यावरील मुरूम पुटकुल्या म्हणजेच मूहासे येणे बंद होत.
संत्र्याची पावडर चेहऱ्यावरील घाण साफ करण्यास मदत करते. संत्र्याच्या पावडरमध्ये गुलाब पाणी (rose water) मिक्स करून लावल्यास डाग सुद्धा निघून जातात,
4.चेहऱ्यावरील डाग जाऊन त्वचेचा रंग उजळतो.
संत्र्याच्या सालाच्या पावडरनी त्वचा स्वच्छ होऊन डाग जाऊन रंग चांगला उजळतो.
5. केसांसाठी खूप फायदेमंद आहे.
संत्र्याची साल फक्त स्कीन साठी फायदेमंद असून केसांसाठी सुद्धा औषधी आहे. जर डोक्यामद्धे कोंडा झाला असेल तर त्यासाठी उपयोगी आहे. तसेच केस खूप गळत असतील (हेयर फॉल) किंवा केसांची चमक गेली असेलतर संत्र्याच्या सालाचा उपयोग करावा.
तेल व संत्र्याची पावडर ह्याचे सम प्रमाण घेऊन मिक्स करून केसांना लावावे एक तास तसेच ठेऊन मग साध्या पाणी वापरुन धुवावे. असे आठोडयातून 2-3 वेळा करावे त्यामुळे केस छान चमकदार होतात.
संत्र्याच्या सालामध्ये विटामीन “c” आहे ते आपल्या केसांसाठी लाभदायक आहे.