जायफळचे आश्चर्यकारक फायदे व काही तोटे व जायफळ तेल कसे बनवायचे
Amazing Health Benefits Of Nutmeg Jaiphal And Jaiphal Oil In Marathi
आपले भारतीय पदार्थ हे जगभर प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्यामध्ये कोणी सुद्धा आपला हात धरू शकत नाही. आपले मसाले सुद्धा मस्त असतात त्यामुळे पदार्थाला छान चव येते. मसाल्यामध्ये जायफळ आपल्या परिचयाचे आहेच. जायफळ ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आपल्या येथे प्रतेक घरात जायफळ हे असतेच. जायफळ हे फक्त खाण्यातच वापरले जात नाही तर त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत.
The Marathi language video Amazing Health Benefits Of Nutmeg Jaiphal be seen on our YouTube Channel of Amazing Health Benefits Of Nutmeg Jaiphal And Oil
आपण जायफळचे काय फायदे व तोटे आहेत ते पाहणार आहोत.
1. जायफळ रसाने कडवट, तीक्ष्ण, गरम, रुची उतपन्न करणारे, तिखट, जुलाबात गुणकारी, तसेच कफ व वायुनाशक आहे. तसेच खोकला, उलटी, सर्दी व हृदयरोग दूर करते.
2. लहान मुलांना सर्दी मुळे जुलाब होत असतील तर तुपामध्ये जायफळ उगळून त्याचे चाटण द्यावे. जर मोठ्या लोकाना जुलाबाचा त्रास होत असेल तर कोरी कॉफीमध्ये जायफळ घालून उकळून सेवन करण्यास द्यावे.
3. जायफळ उगाळून त्याचा लेप डोक्यावर लावल्यास डोके दुखी थांबते.
4. जायफळ ही सुगंधी, वात हारक, वेदनाशामक, ताण नाशक, उतेजक, मादक आहे. जायफळाच्या सेवणाने पाचकरस वाढतो, भूक लागते. व अन्न पचन होते.
5. जायफळ हे जगभर प्रसिद्ध आहे. त्याचा उपयोग मिठाई बनवण्यासाठी किंवा पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा केला जातो.
आता आपण जायफळचे औषधी गुणधर्म किंवा फायदे काय आहेत टे पाहूया.
1. झोप येत नसेलतर त्यावर जायफळ खूप गुणकारी आहे.
झोप येत नसेलतर जायफळ हा एक रामबाण उपाय आहे. 1 ग्लास गरम दूध घेऊन त्यामध्ये एक चिमटी जायफळ पावडर घालून मिक्स करून गरम गरम दूध सेवन करा नक्की झोप येईल.
2.पचनशक्तिमध्ये सुधारणा होते.
जायफळचा उपयोग पचन शक्ति सुधारण्यासाठी केला जातो. आपली पचन शक्ति बिघडली असेल तर जायफळ सेवन केल्याने ती सुधारते. त्याच बरोबर पोट सुद्धा साफ होते.
3.दुखणे थांबते
जायफळचच्या तेलामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण आहेत त्यामुळे त्याचा वापर केल्याने दुखत असलेल्या भागावर लावल्याने आराम मिळतो. जर पोटात दुखट असेल तर पोटाला वरतून लावावे.
4.स्कीनसाठी उपयोगी
जायफळ मध्ये एंटीबैक्टीरियल एंटीफंगल गुण आहते त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल कमी होण्यास उपयोगी आहे. कारण की पिंपल बैक्टीरिया च्या मुळे येतात. तेव्हा पिंपल आलेल्या ठिकाणी कापसाने जायफळचे तेल लावावे.
जायफळ तेल कसे बनवायचे
साहीत्य: 1 जायफळ, 50 ग्राम खोबरेल तेल, 1 काचेची बाटली
कृती: प्रथम जायफळ जाडसर वाटून घ्या. मग एका स्वच्छ बाटलीमध्ये जायफळ पावडर व खोबरेल तेल घालून मिक्स करा. बाटलीचे झाकण घट्ट बंद करून 3 दिवस कडक उन्हात ठेवा. मग गाळणीने गाळून घेऊन परत बाटलीत भरून ठेवा. लागेल तसे 1 किंवा 2 थेंब वापरा.
जायफळच्या तेलाचा उपयोग
जायफळचे तेल डिफ्यूजरमध्ये घालून इन्हेल करू शकता. जायफळचे तेल दाताच्या हिरड्यावर लाऊ शकता.
जायफळचे तेल मसाज करण्यासाठी लाऊ शकता. जायफळ तेलाचे 2-3 थेंब थोड्या पाण्यात घालून माउथवॉश सारखा उपयोग करू शकता. जायफळचे तेल मिठाईसाठी वापरू शकता.
पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जायफळचे तेल अगदी प्रमाणा बाहेर वापरू नका.
जायफळचे तेल अतिप्रमाणात वापरल्याचे तोटे
छातीमध्ये दुखणे, डबल इमेज दिसणे, तोंड कोरडे होणे, डोळे दुखणे, पोट दुखणे, मळमळणे, छातीत धडधडणे, चिंता, डोकेदुखी, चक्कर, आळस येणे
जायफळच्या तेलाचा उपयोग डॉक्टरी सल्यानुसार केला तर चांगले.